Mumbai Municipal Hospital : दिलासादायक ! रुग्णखाटांची प्रतीक्षा संपणार

महापालिका रुग्णालयांत ठोस नियोजन, इतर विभागांत रिक्त बेडवर उपचार
KEM Hospital, Mumbai
KEM Hospital, Mumbai Pudhari News Network
Published on
Updated on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांत पंधरा हजारांहून अधिक रुग्ण खाटा उपलब्ध असताना नियोजनाअभावी रुग्णांची गैरसोय होते. यापुढे ही तक्रार येणार नाही, याची काळजी महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली असून तसे नियोजन केले आहे. ज्या वॉर्ड किंवा विभागांमध्ये रिकामे बेड असतील तेथे रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत दररोज ४० हजार रुग्णांची तपासणी होते, तर यातील आठ हजारांहून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. मात्र १५ हजारांहून अधिक खाटा असतानाही त्या अपुऱ्या पडतात. रुग्णांना अत्यावश्यक वेळीही या रुग्णालयातून इतर रुग्णालयात नातेवाइकांना घेऊन जावे लागते.

खाटांची कमतरता असल्याने अनेकदा एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्यात येते. काहीवेळेस तर जमिनीवर किंवा स्ट्रेचरवर उपचार केले जातात. यापुढे तसे होणार नाही, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

KEM Hospital, Mumbai
Healthcare crisis KEM hospital : केईएममध्ये दोन रुग्ण एकाच बेडवर

नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले की, रुग्णालयातील नेत्ररोग, ईएनटी, शस्त्रक्रिया, बालरोग, मेंदू आणि नेफ्रोलॉजी, मूत्ररोग अशा अनेक विभागांमध्ये खाटा रिकाम्या असतात. या वॉर्डमधील खाटा मेडिसिनसारख्या वॉर्डमध्ये दाखल असलेल्या रुग्णांसाठी वापरल्या जातील. ज्या रुग्णांची प्रकृती स्थिर झाली आहे आणि ज्यांना २४ तास वैद्यकीय देखरेखीची आवश्यकता नाही अशा रुग्णांसाठी रिकाम्या खाटा वापरल्या जातील. यामुळे गंभीर आजारी रुग्णांना खाटा सहज उपलब्ध होतीलच, शिवाय एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णाला संसर्ग होण्याचा धोकाही कमी होईल. इतर महानगरपालिका रुग्णालयांमध्येही ही पद्धत राबवली जाईल, असे त्यांनी सांगितले.

रुग्णखाटांची उपलब्धता अशी

मुंबई महानगरपालिकेकडून ४ वैद्यकीय महाविद्यालये, १ दंत महाविद्यालय, १६ उपनगरीय महाविद्यालये चालविली जातात. या रुग्णालयांत पाच विशेष रुग्णालये आहेत. सायन, नायर, केईएम आणि कूपर रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयात ७,१०० खाटा आहेत. उपनगरीय रुग्णालयांमध्ये ४,००० खाटा आहेत आणि विशेष रुग्णालयांमध्ये ३,००० खाटा आहेत. एकूणच, महानगरपालिका रुग्णालयांमध्ये अंदाजे १५,००० खाटा आहेत. दरवर्षी सरासरी ३ दशलक्षांहून अधिक रुग्णांना आंतररुग्ण सेवांचा लाभ मिळतो.

KEM Hospital, Mumbai
KEM Mumbai|केईएम रुग्णालयात कमी खर्चात व्हेरिकोज व्हेन्सवर उपचार

ऋतूबदलामुळे रुग्णसंख्येत वाढ

ऋतूबदलाच्या काळात, महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढते. या काळात रुग्णांना सामान्य वॉर्डमध्ये, विशेषतः मेडिसिन वॉर्डमध्ये बेड मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हताश होऊन, एका बेडवर दोन रुग्ण असतात. शिवाय, जमिनीवर गाद्या टाकून रुग्णांवर उपचार केले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news