

मुंबई : मुंबईत हवेतील प्रदूषणाचा स्तर वाढण्याची समस्या कायम आहे. धूळ, धूर व बांधकाम स्थळांवरील प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता घसरत असल्याने मुंबई महापालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी मोठी मोहिम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या ९ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ८,३९० विकासकामांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून ३,४५८ ठिकाणी थेट काम थांबवण्याची कारवाई करण्यात आली आहे.
मुंबईत सध्या महापालिका, एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, एमएमआरसीएल, एमआयडीसी, तसेच खासगी विकासक आणि इतर प्राधिकरणांच्या अखत्यारीत ८ हजारांहून अधिक बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर धूळ उडणे, माती वाहून जाणे, बांधकाम साहित्य खुले ठेवणे व ट्रकच्या हालचालींमुळे प्रदूषण वाढत निरीक्षण पर्यावरण असल्याचे विभागाने केले आहे.
हवेतील प्रदषणाचे प्रमाण 'खराब' किंवा 'अतिखराब' पातळीवर पोहोचू नये, यासाठी महापालिकेने २८ प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या नियमांचे पालन होत आहे का, हे पाहण्यासाठी प्रत्येक वॉर्डात विशेष तपासणी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
मनपाच्या पर्यावरण विभागाने जानेवारी ते सप्टेंबर २०२५ दरम्यान तपासणी केली असता, अनेक विकासकांनी मार्गदर्शक तत्त्वे धाब्यावर बसल्याचे आढळले. त्यामुळे ८,३९० बांधकामांना कारणे दाखवा नोटीस, तर ३,४५८ बांधकामांना थेट 'काम थांबवा' नोटीस देण्यात आली आहे.
विकासकांमध्ये धावपळ
महापालिकेच्या नोटीसा मिळाल्यानंतर विकासक व बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. 'काम थांबवा' नोटीसा मिळाल्यानंतर अनेकांनी तातडीने धूळ
नियंत्रण, फॉगिंग, नेट कव्हर, पाण फवारणी, ट्रक वॉशिंगसारख्य उपाययोजना सुरू केल्या. परिणाम आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंत २,६९२ विकासकामांची नोटीस मा घेण्यात आली आहे. पर्यावरण नियमांचे पालन करण्याबाबत सन प्राधिकरणांना एमएमआरडीए, म्हाड एसआरए, एमएमआरसीएल एमआयडीसी, क्रेडाई, एमसीएचआय नरेडको यांनाही सूचना देण्यात आल्य आहेत.