Mumbai Municipal Corporation: मुंबई महापालिकेत महायुतीचा तिढा कायम; एकत्र येण्यावर शिवसेना–राष्ट्रवादी अनिच्छुक

समित्यांतील संख्याबळ धोक्यात; भाजप आग्रही, मुख्यमंत्री फडणवीस मध्यस्थीच्या भूमिकेत
Mumbai Municipal Corporation Election
Mumbai Municipal CorporationPudhari News Network
Published on
Updated on

मुंबई : राजेश सावंत

मुंबई महानगरपालिकेत एकत्र येण्यासाठी भाजपा-शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये मतभेद कायम आहेत. भाजपा मात्र एकत्र येण्यासाठी आग्रही असला तरी, आपल्या पक्षाचे अस्तित्व धोक्यात येईल म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित मुंबई विकास आघाडी स्थापन करण्यासाठी उत्सुक नाहीत.

Mumbai Municipal Corporation Election
Mumbai Ahmedabad Bullet Train: बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; पालघरमध्ये दुसऱ्या माऊंटन टनेलचे भुयारीकरण पूर्ण

मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काठावर पास झालेल्या भाजपा, शिवसेना महायुतीचे विविध समित्यांमधील सदस्य पदांचे गणित सुटण्यासाठी भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणे आवश्यक आहे. सोमवारी भाजपासह शिवसेनेने स्वतंत्र गट स्थापन केला. राष्ट्रवादी काँग्रेसही स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आग्रही आहे. किमान राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना गटात सामील व्हावे, असे भाजपाचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला गटनेते पद हवे असल्यामुळे त्यांच्या नगरसेविका डॉ. सईद खान यांनी शिवसेनेत दाखल होण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आता हा गट शिवसेनेत दाखल होण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Mumbai Municipal Corporation Election
Maharashtra Budget 2026: 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प; मुख्यमंत्री फडणवीस ठरणार विधिमंडळाच्या इतिहासातील पहिले अर्थसंकल्प मांडणारे मुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसनेे स्वतंत्र गट स्थापन केला तरी अजून एक पर्याय महायुतीकडे आहे. या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन मुंबई विकास आघाडी स्थापन केल्यास त्यांच्या संख्येच्या आधारावर समिती सदस्यांची संख्या ठरवता येईल. तिन्ही पक्ष एकत्र आल्यास प्रत्येक समितीमध्ये महायुतीचा एक सदस्य वाढणार आहे. पण मुंबई विकास आघाडी स्थापन केल्यास आघाडीचे सर्व निर्णय तिन्ही पक्षांना मान्य करावे लागणार आहेत. त्यामुळे कोणत्याच पक्षाचे स्वतंत्र मत राहणार नाही. शिवसेनाही आघाडीसाठी फारशी उत्सुक नसल्याचे समजते. त्यामुळे तिन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा तिढा कायम आहे.

Mumbai Municipal Corporation Election
Purandar Airport Development: राज्यातील सर्व अपूर्ण विमानतळ एमएडीसीकडे; पुरंदर विमानतळाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

तिढा सुटण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील

मुंबई महापालिकेच्या समितीतील सदस्य संख्येवरून होणारा घोळ सोडवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत. तिन्ही पक्ष एकत्र आले तरच सुधार समितीमध्ये महायुतीचा एक सदस्य वाढेल. अन्यथा सत्ताधारी महायुती व विरोधकांची समसमान सदस्य संख्या राहू शकते. त्यामुळे सुधार समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लॉटरीच्या आधारावर अध्यक्ष ठरणार आहे. यात विरोधकही बाजी मारू शकतात. त्यामुळे एकत्र येऊन विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न महायुतीकडून सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news