Hospital Cleaning Contract: रुग्णालयांच्या स्वच्छतेवर 101 कोटींची खैरात; मंजुरीसाठी स्थायी समितीत आज प्रस्ताव

सर्वाधिक 27 कोटी कूपरच्या स्वच्छतेवर होणार खर्च
Hospital Cleaning Contract
Hospital Cleaning ContractPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबई महापालिका आपल्या रुग्णालयांच्या स्वच्छतेवर तीन वर्षांत तब्बल 101 कोटी रुपये महापालिका खर्च करणार आहे. यात सर्वाधिक 26 कोटी रुपये खर्च विलेपार्ले येथील आर. एन. कूपर हॉस्पिटलच्या स्वच्छतेवर होणार आहे. यासाठी कंत्राटदाराचीही नियुक्ती करण्यात आली असून आज स्थायी समितीत ही निविदा मंजुरीसाठी येणार आहे.

महापालिका हॉस्पिटलची स्वच्छता गेल्या काही वर्षांपासून कंत्राटदारामार्फत केली जात आहे. येणाऱ्या तीन वर्षांसाठी महापालिकेच्या केईएम, सायन, नायर, कूपर, नायर दंत महाविद्यालय, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर जोगेश्वरी, बोरिवली भगवती व मुलुंड अगरवाल हॉस्पिटल या हॉस्पिटलच्या स्वच्छतेवर येणाऱ्या तीन वर्षांत 101 कोटी 3 लाख 63 हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. यासाठी कंत्राटदारांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

Hospital Cleaning Contract
Opertaion Tiger: एकनाथ शिंदे - पाटील भेटीने ‌‘ऑपरेशन टायगर‌’ची चर्चा

6 रुपये 78 पैसे ते 7 रुपये 6 पैसे प्रतिचौरस फूट स्वच्छतेसाठी मोजावे लागणार आहेत. उदाहरणार्थ केईएम हॉस्पिटलच्या 10 लाख 92 हजार 428 चौरस फूट क्षेत्रफळाच्या स्वच्छतेसाठी मासिक 74 लाख 6 हजार रुपये खर्च येणार आहे, तर तीन वर्षांसाठी 26 कोटी 66 लाख 39 हजार रुपये कंत्राटदाराला देण्यात येणार आहेत.

आठ हॉस्पिटलच्या सुमारे 40 लाख 91 हजार 256 चौरस फूट क्षेत्रफळाची स्वच्छता करण्यात येणार आहे. यात सर्वात कमी खर्च नायर दंत महाविद्यालयाच्या स्वच्छतेवर होणार आहे. या महाविद्यालयाच्या स्वच्छतेसाठी मासिक 9 लाख 71 हजार रुपये इतका खर्च येणार आहे. अन्य हॉस्पिटलच्या स्वच्छतेसाठीही मासिक 15 लाख ते 75 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

Hospital Cleaning Contract
Navghani Workers Recruitment: बेस्टचा ‘नवघाणी‌’ शब्द बदलणार !

एका सफाई कामगाराचा मासिक पगार 29 हजार 584

एका सफाई कामगाराचा वार्षिक पगार सरासरी 3 लाख 55 हजार रुपये इतका होणार आहे. यात मासिक पगार 29 हजार 584 रुपये इतका असून मूळ वेतन 11 हजार 500 रुपये, महागाई भत्ता 9 हजार 100 रुपये, भविष्य निर्वाह निधी, सानुग्रह अनुदान व अन्य फायदे दिले जाणार आहेत.

निविदा वादात सापडणार

प्रमुख महापालिका रुग्णालयांतील स्वच्छतेसाठी शंभर कोटींची निविदा बुधवारी स्थायी समितीत मंजुरीसाठी येण्यापूर्वीच प्रक्रियेत गडबड झाल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. त्यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र पाठवून आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशीची मागणी केली आहे.

ही निविदा अंदाजित खर्चापेक्षा 20% पेक्षा कमी दराने बोली लावण्यात आली असून कंत्राटदाराने कामगार व पर्यवेक्षकांसाठी ग्रॅच्युइटी, सेवा शुल्क आणि सुरक्षा साहित्य यांसारख्या महत्त्वाच्या बाबींमध्ये ‌‘शून्य‌’ दर दाखवला आहे. त्यामुळे यात गडबड असल्याचे म्हटले आहे.

तीन वर्षांसाठी असा येणार खर्च

  • केईएम 26 कोटी 66 लाख रुपये

  • सायन 12 कोटी 17 लाख रुपये

  • नायर 5 कोटी 61 लाख रुपये

  • कूपर 27 कोटी 6 लाख रुपये

  • नायर दंत 3 कोटी 49 लाख रुपये

  • ट्रॉमा केअर 4 कोटी 84 लाख रुपये

  • भगवती 13 कोटी 82 लाख रुपये

  • अगरवाल 7 कोटी 35 लाख रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news