Navghani Workers Recruitment: बेस्टचा ‘नवघाणी‌’ शब्द बदलणार !

तातडीने मान्सूनपूर्व कामांसाठी 686 नवघाणी कामगारांची बेस्टमध्ये भरती केली जाणार आहे.
Navghani Workers Recruitment
Navghani Workers RecruitmentPudhari
Published on
Updated on

मुंबई: बेस्ट प्रशासनातील नवघाणी कामगारांचा अर्थ समजत नसल्यामुळे अनेक बँकांकडून या कामगारांना कर्ज नाकारले जाते. त्यामुळे नवघाणी या शब्दाचा नेमका अर्थ शोधून त्याऐवजी दुसरा शब्द रूढ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसेच तातडीने मान्सूनपूर्व कामांसाठी 686 नवघाणी कामगारांची बेस्टमध्ये भरती केली जाणार आहे.

Navghani Workers Recruitment
BEST open deck buses: बेस्ट दहा ओपन डेक दुमजली बस विकत घेणार

बेस्ट विद्युत पुरवठा विभागात खोदकाम करणाऱ्या, रस्त्यावर केबल लाईनसाठी खड्डे पाडणाऱ्या, विद्युत उपकरणाची ने आण करणाऱ्या कामगारांना नवघाणी कामगार म्हणून ओळखले जाते. माजी कामगारांची मुले ही कामे करतात. मात्र नवघाणी या शब्दाचा अर्थ बँकेच्या व्यवहारात स्पष्ट होत नाही. त्यामुळे अनेक बँकांकडून या कामगारांना कर्ज दिले जात नाही. त्यासाठी बेस्ट समितीच्या मंगळवारच्या बैठकीत हा शब्द बदलून नवा शब्द रूढ करण्यावर चर्चा झाली.

Navghani Workers Recruitment
Ashram Schools Upgrade: आदिवासींच्या चोवीस आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाचा निर्णय
  • बेस्टमध्ये 686 नवघाणी कामगारांची तातडीने भरती

  • दरवर्षी 150 कामगार निवृत्त होत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. शहरात 10 लाख बेस्ट वीजचे ग्राहक आहेत.

  • 1260 जागा रिक्त आहेत. वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार होतात. तेव्हा मान्सूनपूर्व कामासाठी तातडीने 686 नवघाणी कामगारांची भरती करावी, या प्रस्तावाला बेस्ट समितीच्या सभेत मंजुरी मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news