BMC Employees Bonus | मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; ३३ हजार बोनस जाहीर

महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय
Mumbai municipal corporation news
Mumbai municipal corporation newsPudhari
Published on: 
Updated on: 

BMC Employees Diwali Bonus Announced

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त ३३ हजार रुपये बोनस (सानुग्रह अनुदान) देण्याचा निर्णय बुधवारी (दि.२८) महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे सुमारे एक लाख पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड जाणार आहे.

मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त यंदा २० टक्के म्हणजेच सरासरी ५० हजार रुपये सानुगृह अनुदान मिळावे, अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनने केली होती. परंतु मुंबई महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा दोन हजार रुपये वाढीव सानुग्रह अनुदान देण्यास महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तयारी दर्शवली.

Mumbai municipal corporation news
Mumbai municipal corporation hall: दोन वर्षांत महापालिका उभारणार नवे सभागृह!

गेल्या वर्षी ३१ हजार रुपये बोनस देण्यात आला होता. यावेळे हा बोनस ३३ हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो. बोनसबाबत कामगार संघटनांशी वाटाघाटी करून, अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते.

दरम्यान, दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी वाढती महागाई लक्षात घेता किमान ५० हजार रुपये बोनस मिळावा, अशी मागणी लावून धरली होती. कामगार संघटना व प्रशासनातील तिढा न सुटल्यास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने हा तिढा सोडवला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news