

मुंबई : मुंबई महापालिकेच्या 2025-26 च्या 227 प्रभागासाठी सोडण्यात आलेल्या आरक्षित सोडतीमध्ये 114 महिलांना प्रभागाची लॉटरी लागली होती, त्यानुसार राजकीय पक्षांकडून उमेदवारी देताना महिलांना संधी देण्यात आली आहे. यामुळे आता मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात महिला नगरसेवकांचा आवाज घुमणार आहे.
शुक्रवार, 16 जानेवारी रोजी महापालिकेच्या 227 वॉर्डच्या लागलेल्या निकालात सुमारे 114 महिलांना महापालिकेत स्थान मिळाले. यात भारतीय जनता पार्टी पक्षातील सर्वाधिक महिला नगरसेविका झाल्या आहेत, तर दुसऱ्या स्थानावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील महिलांचा समावेश आहे.
मुंबई महापालिकेत महिला महापौर बसेल की नाही, हे आगामी महापौर आरक्षण सोडतीनंतर जाहीर होईल. मात्र नुकत्याच लागलेल्या निकालानुसार महिलांचा आवाज वाढलेला दिसून येत आहे. बोरिवली विधानसभामधील 7 पैकी 6 वॉर्डांतून महिला निवडून आल्या आहेत.
महिला शक्ती
भारतीय जनता पार्टी - 44
उद्धव बाळासाहेब ठाकरे - 39
शिवसेना (शिंदे गट) - 19
काँग्रेस पार्टी - 08
महाराष्ट्र नवनिर्माण सेना -04