Mumbai News | आयटीचा एफएसआय वापरून 12 गिरण्यांच्या जागांवर बिल्डरांनी उभारले पब आणि बार

IT FSI Misuse | प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांची समिती नेमली आहे.
Mumbai Builders Illegal Bars
Mumbai Mills(File Photo)
Published on
Updated on

Mumbai Builders Illegal Bars

मुंबई : मुंबईतील बारा गिरण्यांच्या जागांवर बिल्डरांनी पब, बार, रेस्टॉरंट उभारून घोटाळा केल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांची समिती नेमली आहे.

बारा गिरण्यांच्या जागांबाबत पालिका अधिकार्‍यांकडून माहिती घेतली असता कमला मिलप्रमाणे या सर्व गिरण्यांच्याही जमिनी काढण्यात आल्याचे समोर आले आहे. आयटी क्षेत्रासाठीचा एफएसआय वापरून त्या जागांवर पब, बार, रेस्टॉरंट उभारण्यात आले आहेत. बिल्डरांनी अनियमितता करून, अवैधपणे आयटीसाठीच्या जादा एफएसआयचा वापर दुसर्‍याच कामासाठी करत या जागा बळकावल्या आहेत.

Mumbai Builders Illegal Bars
Mumbai Mango News | मे महिन्याच्या पावसात एपीएमसीतील हापूस व्यापार्‍यांचे 125 कोटींचे नुकसान

या प्रकरणात अभिजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांसह अभ्यासकांचा समावेश असणार आहे. या तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून अशा जागांबाबतचा अहवाल सादर करावा, असे निर्देश समितीला देण्यात आले आहेत.

Mumbai Builders Illegal Bars
Mumbai Gangster News | गँगस्टर रवी पुजारीची हत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता

या समितीचाही अहवाल आल्यानंतर मिलच्या जागांवर अनियमितता करणार्‍या बिल्डरांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे विधिमंडळाच्या आश्वासन समितीचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी सांगितले.

या समितीच्या अहवालानंतर आश्वासन समितीचे सदस्य या बारा मिलच्या जागांची प्रत्यक्ष पाहणी करतील, असेही राणा म्हणाले. यानिमित्ताने नियमबाह्य पद्धतीने मुंबईतील गिरण्यांच्या जागांवर चालणारे पब, बार आणि रेस्टॉरंट आता आश्वासन समितीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news