

Underground Metro Tarp Issue
मुंबई : पहिला पावसाने आचार्य अत्रे चौक स्थानकाची दाणादाण उडवल्यानंतर एमएमआरसीएल सावध झाली आहे. भुयारी मेट्रोच्या ज्या प्रवेशद्वारांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, त्या ठिकाणी ताडपत्रीचे आच्छादन टाकले जात आहे.
मुंबईत मेच्या अखेरच्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे भुयारी मेट्रोच्या आचार्य अत्रे चौक स्थानकात पाणी शिरले होते. त्यामुळे स्थानकाचे बरेच नुकसान झाले. तसेच मेट्रो प्रशासनाची नाचक्की झाली होती.
बांधकाम सुरू असलेल्या प्रवेशद्वारातून हे पाणी आत शिरले होते. त्यामुळे यापुढे पुन्हा अशी घटना घडू नये, यासाठी बांधकाम सुरू असलेल्या प्रवेशद्वारांना ताडपत्रीने झाकले जात आहे.