मुंबई : मुंबई मेट्रो -3च्या कामात बाधित झालेले बुद्ध विहार मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनने 2017 साली दिले होते. मात्र आता 8 वर्षांनंतर पर्यायी व्यवस्था न करता कार्पोरेशनने ते सील केले. यामुळे परिसरातील भीम सैनिकांमध्ये प्रचंड नाराजी असून दोषी अधिकार्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
येथील शांतीनगर, गौतम बुद्ध रिलिजियस अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट रजि. नावाचे बुध विहार हे 1970 पासून आहे. या विहाराची धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीसुध्दा आहे. मात्र तरीसुध्दा एमएमआरसी अधिकारी सीमा सातपुते यांनी सदर विहाराच्या कमिटीला कुठलीही विचारपूस न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा काढून टाकण्यास सांगितले.
यानंतर सोबत आणलेला लॉक लावला. या घटनेमुळे भीमसैनिकांमध्ये प्रचंड संताप असून सातपुते यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अंजू नाडगिरी यांनी केली आहे.