Shahapur Bus Brake Failure: ब्रेक फेल, समोर दरी अन् बसमध्ये ३० प्रवासी; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली

उताराच्या रस्त्यावर ३० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचे अचानक ब्रेक निकामी झाले. चालक अनिल साबळे यांनी प्रसंगावधान राखत बस उजवीकडे वळवली. बस संरक्षक भिंतीवर आदळून थांबल्याने मोठी दुर्घटना टळली.
Shahapur Bus Brake Failure
Shahapur Bus Brake FailurePudahari
Published on
Updated on

राजेश जागरे

शहापूर: उताराचा रस्ता... बसमध्ये तब्बल ३० प्रवासी... अचानक ब्रेकने साथ सोडली आणि काही क्षणांतच बसवरील चालकाचा ताबा सुटला! समोर दरी व बस वेगाने पुढे जात असल्याने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला.

मात्र चालक अनिल साबळे यांनी क्षणाचाही विलंब न करता बस उजव्या बाजूला वळवली. बस संरक्षक भिंतीवर आदळून थांबली व मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.

या अपघातात ११ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाची प्रकृती बिघडल्याने त्याला ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे.

शहापूर तालुक्यातील कोठारे गावाजवळ सोमवारी हा थरारक अपघात घडला. कोठारे येथून ३० प्रवाशांना घेऊन शहापूरच्या दिशेने शहापूर आगाराची एसटी बस निघाली होती. बस उतारावर असताना अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला.

Shahapur Bus Brake Failure
Maharashtra MLC Election: विधानपरिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांच्या ५ जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान; २७ ऑक्टोबरला मतमोजणी

अवघ्या काही क्षणांत बस वेगाने पुढे सरकू लागल्याने प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. मात्र चालक अनिल साबळे यांनी प्रसंगावधान राखत बस उजव्या बाजूला वळवली. त्यामुळे बस संरक्षक भिंतीवर आदळून थांबली. बस डाव्या बाजूला गेली असती तर ती थेट दरीत कोसळली असती.चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघातात देऊ पोकळा, करुणा मधे, करण भुतांबरे, हिरा उर्फ वैशाली देसले, मंगळी वीर, धोंडू देसले, शिडू हंबीर, आशा देसले, कमल लखांबरे, भागी पादीर, ज्योती लखांबरे, सपना भगत, फसाबाई देसले, चंद्रकांत जाधव, वैशाली फसाळे, शांता फसाळे व कांचन हिंदोळे यांच्यासह प्रवासी जखमी झाले आहेत.

जखमींना स्थानिकांनी मदत करून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. एकाची प्रकृती बिघडल्याने त्याला ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Shahapur Bus Brake Failure
Mumbai Coastal Road BMW Accident: कोस्टल रोडवर 120 किलोमीटर वेगाने धावली बीएमडब्ल्यू

जखमी प्रवाशांना नियमानुसार मदत

ब्रेक निकामी झाल्यानंतर बस दरीत जाण्यापासून रोखणे हे चालकासमोर मोठे आव्हान होते. मात्र अनिल साबळे यांनी वेळीच बस उजवीकडे वळविल्याने ती संरक्षक भिंतीवर आदळून थांबली. बस दरीत कोसळली असती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.

त्यामुळे चालकाच्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे. दरम्यान, चालकाचा ताबा सुटल्याचे शहापूर आगार व्यवस्थापक मानसी शेळके यांनी सांगितले. जखमी प्रवाशांना नियमानुसार प्राथमिक आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news