Mumbai Mayor Election: मुंबईचा महापौर कोण? 7 फेब्रुवारीला उमेदवार जाहीर होणार

11 फेब्रुवारीला निवडणूक; महायुती–महाविकास आघाडीतील हालचालींना वेग
Mumbai Mayor Election
Mumbai Mayor ElectionPudhari
Published on
Updated on

मुंबई : मुंबईच्या महापौर व उपमहापौर पदासाठी बुधवार 11 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत असून शनिवार 7 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. महायुती व महाविकास आघाडीने उमेदवार कोण हे अद्याप जाहीर केले नाही. त्यामुळे मुंबईचा महापौर कोण, हे शनिवारीच समजणार आहे.

Mumbai Mayor Election
Mumbai Pune Expressway: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर खोळंबा, प्रवाशांसाठी तीन पर्यायी मार्ग जाणून घ्या

दरम्यान महापौर, उपमहापौर, स्थायी समितीसह सुधार समिती व अन्य समित्यांच्या अध्यक्षपदाचे भाजपा- शिवसेना महायुतीमध्ये कसे वाटप करायचे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये येत्या दोन दिवसांत चर्चा होणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी सांगितले. महापौर व उपमहापौर पदाचे नाव आजही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे शनिवारीच उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ही नावे महायुती व महाविकास आघाडीमार्फत जाहीर होण्याची शक्यता आहे. बुधवार 11 फेब्रुवारीला होणाऱ्या या निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली असून महापौर निवडीचा सोहळा सर्वसामान्य नागरिकांना पाहता यावा, यासाठी महापालिका मुख्यालयाबाहेर स्क्रीन उभारण्यात येणार आहे. सभागृहातील जागेची व्यवस्था लक्षात घेता मोजक्याच लोकांना प्रवेश देण्यात येणार आहे. सभागृहातील गॅलरी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसाठी राखीव ठेवली जाणार आहे. विशेष म्हणजे यूट्यूब व अन्य सोशल मीडियाद्वारे महापौर निवडणुकीचा कार्यक्रम नागरिकांना बघता येणार आहे.

Mumbai Mayor Election
Maharashtra Semiconductor Investment: सेमीकंडक्टर संधीचा महाराष्ट्राला सुवर्णयोग

भगवी झालर उतरली! उद्धव, आदित्य ठाकरेंचे फोटोही हटवले

मुंबई : मुंबई महापालिकेवर भाजपा-शिवसेना महायुतीची सत्ता येणार असून आपल्याला अपेक्षित असलेले कार्यालय व दालन असावे, यासाठी भाजपाने विशेष लक्ष दिले आहे. मुख्यालयातील दालनांमधील भगवी झालर उतरवण्यात आली आहे. पक्षाचे कार्यालय नाही, तर शासकीय कार्यालय दिसावे अशी रंगसंगती असलेले इंटिरिअर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या 25 वर्षांपासून महापौर व विविध अध्यक्षांच्या दालनात लावलेले उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे फोटोही हटवण्यात आले आहेत. केवळ दालनांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह राष्ट्रपती, पंतप्रधान, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्यात येणार आहेत. त्याशिवाय महायुतीतील ज्या पक्षाचा अध्यक्ष असेल, त्या पक्षाच्या नेत्याचा फोटो दालनात लावण्यास परवानगी राहणार आहे.

Mumbai Mayor Election
Maharashtra Disaster Relief Fund: नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक धोका; महाराष्ट्राला 39,492 कोटींचा विक्रमी निधी

शिवसेनेच्या सत्तेत महापौरांच्या दालनासह अन्य दालने व कार्यालये तसेच सभागृहात भगवे वातावरण होते. अगदी महापौर, अध्यक्षांच्या खुर्च्या व टेबलेही भगवी करण्यात आली होती. एवढेच काय तर स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयाच्या दरवाजावर भगवे पडदे लावण्यात आले होते. गाड्यांची पडदेही भगवे होते. विविध समित्यांचे अध्यक्ष, प्रभाग समिती अध्यक्ष यांच्या खुर्च्यांचे कापडही भगवे होते.

Mumbai Mayor Election
JJ School of Art: ‘लोकल टू ग्लोबल’ दिशेने जे. जे. स्कूल ऑफ आर्टची वाटचाल; कला शिक्षणाला जागतिक व्यासपीठ

यात्रेमुळे निवडणूक पुढे ढकलली

आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेमुळे मुंबई महापौर निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती सर्वच राजकीय पक्षांनी महापालिकेला केली होती. त्यामुळे सोमवार 9 फेब्रुवारीला होणारी महापौर व उपमहापौर निवडणूक बुधवार 11 फेब्रुवारीला ठेवण्यात आल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news