Mumbai Overbridges Closed: मुंबईत मस्जिद बंदर, माटुंगा स्थानकांवरील ४ पादचारी पूल बंद; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा निर्णय

पुलांच्या महत्त्वाच्या भागांची झीज झाली असून, त्यांना गंज चढला आहे.
Mumbai Overbridges Closed
Mumbai Overbridges ClosedPudhari
Published on
Updated on

मुंबई: शहरातील रेल्वे मार्गावरील मस्जिद बंदर आणि माटुंगा स्थानकांवरील चार पादचारी पूल बंद करण्याच्या सूचना मुंबई महापालिकेने मध्य रेल्वेला दिल्या आहेत.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईने केलेल्या संरचनात्मक तपासणीत काही त्रुटी आढळून आल्यानंतर पुनर्बांधणी आणि गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून हे पूल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून शनिवारी जाहीर करण्यात आले.

Mumbai Overbridges Closed
Cyber Farud: सायबर फसवणुकीसाठी घाऊक सिमकार्ड्‌स देणाऱ्यास अटक; बिहार-ओडिशातील १० ठिकाणी छापे

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट, २०२६ रोजी महापालिका आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या चारही पादचारी पुलांची संयुक्त पाहणी करण्यात आली. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी आयआयटी मुंबईने या चारही पुलांचा स्वतंत्र संरचनात्मक तपासणी अहवाल सादर केला.

पुलांच्या महत्त्वाच्या भागांची झीज झाली असून, त्यांना गंज चढला आहे. संभाव्य धोका लक्षात घेत,पालिकने रेल्वे प्रशासनाला हे चारही पूल त्वरित बंद करण्याच्या सूचना केल्या. उत्सवाच्या काळात रेल्वे स्थानके आणि आसपासच्या परिसरात मोठी गर्दी होते.

Mumbai Overbridges Closed
POP Ganesh Idol Immersion: पीओपीच्या गणेशमूर्तींचे रिसायकलिंग होणार; २४ तासांत मूर्ती बाहेर काढण्याचे निर्देश

तसेच पादचाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होते. अशावेळी कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून हे पूल बंद ठेवले जाणार आहेत.

हे पादचारी पूल बंद

१. मस्जिद येथील भंडारी पादचारी पूल

२. मस्जिद स्थानक पूल

३. भाऊ दाजी रोडवरील माटुंगा लेव्हल क्रॉसिंग पादचारी पूल

४. गुरुनानक हायस्कूल माटुंगा-धारावीपादचारी पूल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news