POP Ganesh Idol Immersion: पीओपीच्या गणेशमूर्तींचे रिसायकलिंग होणार; २४ तासांत मूर्ती बाहेर काढण्याचे निर्देश

विसर्जित मूर्तींचे संकलन, सुरक्षित साठवण, शास्त्रीय प्रक्रिया आणि पुनर्वापर यासाठी सर्व विभागीय सहायक आयुक्तांना एसओपी जारी केली आहे.
Ganesh Idols
Ganesh IdolsFile Photo
Published on
Updated on

मुंबई: कृत्रिम तलाव, तात्पुरते विसर्जन तलाव आणि जलाशयांमध्ये विसर्जित केलेल्या पीओपी मूर्ती २४ तासांच्या आत बाहेर काढण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींच्या विसर्जनाने नैसर्गिक जलस्त्रोतांचे नुकसान होऊ नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, महापालिकेने पावले उचलली आहेत.

विसर्जित मूर्तींचे संकलन, सुरक्षित साठवण, शास्त्रीय प्रक्रिया आणि पुनर्वापर यासाठी सर्व विभागीय सहायक आयुक्तांना एसओपी जारी केली आहे.

बाहेर काढलेल्या मूर्ती केवळ निश्चित केलेल्या मुलुंड येथील मूर्ती उतरविण्याच्या साठवण सुविधेपर्यंत सुरक्षितरीत्या पोहोचविण्यात येतील.

Ganesh Idols
Ganeshotsav Private Travel Fare: खासगी बसचालकांकडून कोकण प्रवाशांची लूट

संपूर्ण कार्यवाहीची विभागनिहाय नोंद, वजनकाट्याच्या पावत्या तसेच छायाचित्रे आणि व्हिडीओ नोंदी जतन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

महापालिकेने सुमारे २,८५० मेट्रिक टन पीओपी गणेशमूर्तींच्या साहित्यावर शास्त्रीय प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी अनुभवी संस्था आणि तंत्रज्ञान पुरवठादारांकडून स्वारस्य अर्ज मागवले आहेत.

Ganesh Idols
Thane Kalyan Megablock: मरेचा आज ठाणे-कल्याण ब्लॉक

इच्छुक संस्था कॅल्सिनेशन, रासायनिक विघटन किंवा अन्य शास्त्रीयदृष्ट्या प्रमाणित व पर्यावरणीय नियमांशी सुसंगत तंत्रज्ञान प्रस्तावित करू शकतात. प्रक्रिया केलेल्या साहित्याचा नवीन मूर्ती, प्लास्टर बोर्ड, सिरॅमिक, वैद्यकीय प्लास्टर, विटा किंवा सिमेंट उद्योगातील फिलर म्हणून पुनर्वापर करता येऊ शकतो. पात्र संस्थांची पुढील निविदा प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news