Mumbai Marine Drive Accident: मरीनड्राइव्ह परिसरात भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू

Mumbai Marine Drive Accident
Mumbai Marine Drive Accidentpudhari
Published on
Updated on

Mumbai Marine Drive Accident: मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका ज्येष्ठ नागिरकाचा तर एक तरूण आणि तरूणीचा समावेश आहे. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी पावणे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की तीघांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातात गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्येष्ठ नागरिक हे मॉर्निंग वॉकला जात होते त्यावेळी रस्ता ओलांडताना हा अपघात झाला आहे.

Mumbai Marine Drive Accident
Kalyan-Nagar Highway Accident: कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; 8 जणांचा जागीच मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

नेमकं काय झालं?

ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग वॉक वेळी रस्ता ओलांडताना अपघात झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळतेय. मॉर्निंग वॉक साठी मरीन ड्राईव्ह सकाळी खचाखच भरलेलं असतं कसा झडलाय हा अपघात अपघातामुळे तीन जणांनी आपला जीव गमावलाय. मुंबईचा मरीन ड्राईव्हचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अपघातातील ज्या बाईकचा चक्काचूर झाला आहे त्या बाईक वरून तरुण आणि तरुणी हे सीएसटीच्या दिशेने चालले होते.

Mumbai Marine Drive Accident
Dhule Shirpur Highway accident: धुळे-शिरपूर महामार्गावर एसटीने दुचाकीला चिरडले, ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; आई-वडील जखमी

याचवेळी एक ज्येष्ठ नागरिक रस्ता ओलांडत होता आणि ही भरगाव वेगाने गाडी समोरून आली होती. या गाडीने थेट त्या वयोवृद्धाला धडक दिली. त्याच्यासमोर दोन स्कुटी होत्या त्यांना देखील धडक दिलेली आहे. या भीषण अपघातामध्ये या बाईकवर तरुण आणि तरुणी बसलेले होते या दोघांचाही मृत्यू झालेला आहे तर जो वयोवृद्ध व्यक्ती होता रस्ता ओलांडत होता त्या व्यक्तीचा देखील या भीषण अपघातात मृत्यू झालाय. मृतांची अजून तरी ओळख पटलेली नाही आणि जे वयोवृद्ध होते त्यांची देखील ओळख पटलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news