मुंबई : चेंबूर च्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा संघटनांचा रस्‍ता रोकोचा प्रयत्‍न

मराठा संघटना
मराठा संघटना

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा मराठा आरक्षण आणि विविध मागण्यांवर आज (बुधवार) मराठा संघटना आक्रमक झाल्‍याचे पहायला मिळाले. मुंबईच्या आझाद मैदानात यावेळी आंदोलन करण्यात आले. मुंबई च्या वेशीवर चेंबूर च्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा संघटनांनी ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पुन्हा मुंबई च्या बाहेरून मुंबईत दाखल होणाऱ्या मराठा संघटनांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मराठा मोर्चाचे रमेश केरे पाटील यांची पोलीस उपायुक्त हेमराजसिंग राजपूत यांनी समजूत घातली आणि त्यांना मुक्त मार्गाने मुंबईकडे रवाना केले. आमची फसवणूक करण्यात आली आहे. मात्र आता आम्ही आझाद मैदानात जोरदार आंदोलन करणार तिकडून उठणार नाही अशी भूमिका या वेळी केरे पाटील यांनी मांडली.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news