!-- afp header code starts here -->

Mumbai Dahi Handi Child Death | दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट: विटांचा खांब कोसळून 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मालवणीतील चिकुवाडी येथील घटना; रुग्णालयात नेण्यापूर्वीच घेतला अखेरचा श्वास
Malvani  Chikuwadi Dahi Handi Accident
Malvani Chikuwadi Dahi Handi AccidentPudhari
Published on
Updated on

Malvani Chikuwadi Dahi Handi Accident

मुंबई : दहीहंडीचा उत्सव साजरा करताना दोरी बांधण्यासाठी वापरलेला विटांचा खांब कोसळल्याने सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मालवणीतील चिकुवाडी परिसरात शनिवारी (दि.५) दुपारी घडली. रुद्र कदम (वय ७) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिमेकडील मार्वे रोड परिसरातील एकता वेल्फेअर सोसायटीत स्थानिक पातळीवर दहीहंडीचा उत्सव सुरू होता. काही मुले स्वतःहून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत होती. यासाठी झाडाला तसेच तळमजल्यावरील बांधकामाच्या विटांच्या खांबाला दोरी बांधण्यात आली होती.

Malvani  Chikuwadi Dahi Handi Accident
Mumbai Dahi Handi: मुंबईत दहीहंडीचा थरार! दीड हजार गोविंदा पथके सज्ज; ११ थरांचे लक्ष्य

दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच विटांचा खांब अचानक कोसळला. त्याखाली रुद्र कदम हा सात वर्षांचा मुलगा सापडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी मालवणी जनरल रुग्णालयात हलविण्यात आले.

मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी रुद्र याला ‘रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत’ (Brought Dead) घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वॉर्ड कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news