Mumbai luxury home sales: मुंबईच्या आलिशान घरांचा बाजार तेजीत! सहा महिन्यांत ३२ हजार कोटींची विक्री

एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान ३,१४५ घरांची नोंदणी; वरळीमध्ये सर्वाधिक ५,५५८ कोटींचे व्यवहार
Housing Market
Housing Marketpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: मुंबईत या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत दररोज १७८ कोटी मूल्याच्या १७ आलिशान घरांची विक्री झाली. यामुळे एकूण ३ हजार १४५ व्यवहारांसह विक्रीचे मूल्य तब्बल ३२ हजार ६२३ कोटींवर गेले.

मुंबईत आलिशान घरांना चांगली मागणी असून दररोज ५ कोटी किंवा त्याहून अधिक किंमतीच्या सरासरी १७ पेक्षा जास्त घरांची नोंदणी झाली आहे.

लाईटहाऊस लक्झरी आणि झॅपकी यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान एकूण ३२ हजार ६२३ कोटी मूल्याच्या ३ हजार १४५ आलिशान मालमत्तांची नोंदणी झाली.

Housing Market
Torrent Power project: सह्याद्री वाचवण्यासाठी राज ठाकरेही मैदानात

पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत आलिशान घरांच्या विक्रीचे मूल्य १७.१ टक्क्यांनी वाढले तर, सरासरी घरखरेदी मूल्य ६ टक्क्यांनी वाढून १०.७ कोटी झाले. ५० कोटींपेक्षा जास्त मूल्याचे व्यवहार पहिल्या तिमाहीत ९ होते. त्यांची संख्या दुसऱ्या तिमाहीत २०वर पोहोचली. अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा येथील घरांचे एकूण विक्री मूल्य दुप्पट झाले.

जुलैमध्ये सर्वाधिक उलाढाल

जुलै महिन्यात ६ हजार ६६९ कोटी मूल्याच्या ६१८ घरांची विक्री झाली. संपूर्ण सहा महिन्यांच्या कालावधीत ५० कोटी किंवा त्याहून अधिक किंमतीची २९ घरे विकली गेली, ज्यांचे एकूण मूल्य २ हजार ५३६ कोटी होते.

Housing Market
Matheran Toy Train: ‘माथेरान राणी’ची शुक्रवारपासून पुन्हा झुकझुक

नमन झाना येथील तीन घरे एकूण ४५६ कोटींना विकली गेली. वरळीने २७५ व्यवहारांच्या माध्यमातून २०.२ कोटींच्या सरासरीने ५ हजार ५५८ कोटींची नोंद केली, जे एकूण विक्री मूल्याच्या सुमारे १७ टक्के आहे. अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा येथील मूल्य पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत दुप्पट झाले आणि ताडदेवमध्ये १२५ टक्के वाढ झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news