Matheran Toy Train: ‘माथेरान राणी’ची शुक्रवारपासून पुन्हा झुकझुक

नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा सुरू होणार; वीकेंडला अमन लॉज शटलच्या फेऱ्याही वाढणार
Matheran Toy Train
Matheran Toy TrainPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेली मध्य रेल्वेची नेरळ ते माथेरान दरम्यानची 'टॉय ट्रेन' सेवा ३० ऑक्टोबरपासून (शुक्रवार) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

तसेच, वीकेंडला पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता माथेरान ते अमन लॉज दरम्यानची शटल सेवा शनिवार आणि रविवारी वाढवली जाणार आहे. त्यामुळे हिरव्यागार डोंगररांगा आणि नागमोडी वळणांवरून धावणाऱ्या पर्यटकांच्या लाडक्या 'माथेरानच्या राणी'च्या झुकझुक सफरीचा आनंद येत्या शुक्रवारपासून पर्यटकांना अनुभवता येणार आहे.

Matheran Toy Train
Phulewada development: पुण्यातील महात्मा फुले स्मारकासाठी २३० कोटी मंजूर; देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार संपूर्ण सुशोभीकरण

मध्य रेल्वेकडून खबरदारीचा उपाय म्हणून, दरवर्षी जून ते ऑक्टोबर या पावसाळ्याच्या काळात नेरळ ते माथेरान दरम्यानची मुख्य रेल्वे सेवा बंद ठेवण्यात येते. यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर ती सुरू होण्याची शक्यता होती, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे तिला विलंब झाला.

ही मिनी ट्रेन म्हणजे येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी केवळ वाहतुकीचे साधन नसून, नेरळ स्थानकापासूनच हिरव्यागार डोंगररांगा आणि नागमोडी वळणांवरून माथेरानचे निसर्गसौंदर्य अनुभवत प्रवास करण्याची एक सुवर्णसंधी असते. गेल्या काही महिन्यांपासून मिनी ट्रेन बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत होता. मात्र, आता शुक्रवारपासून पुन्हा एकदा 'माथेरानच्या राणी'ची झुकझुक सफर सुरू होत असल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Matheran Toy Train
Mumbai FDA Action: मुंबई विभागात ८५९ किलो अन्नसाठा जप्त; मिठाईत अतिरिक्त रंगाचा संशय आल्याने एफडीएची कारवाई

नेरळ–माथेरान आणि अमन लॉज–माथेरान दरम्यानचे रेल्वे वेळापत्रक

१) नेरळ–माथेरान मिनी ट्रेन (दररोज)

- नेरळहून सकाळी ०८:५० वाजता सुटेल आणि माथेरानला सकाळी ११:३० वाजता पोहोचेल.

- नेरळहून सकाळी १०:२५ वाजता सुटेल आणि माथेरानला दुपारी १३:०५ वाजता पोहोचेल.

- माथेरानहून दुपारी १४:४५ वाजता सुटेल आणि नेरळला संध्याकाळी १७:३० वाजता पोहोचेल.

- माथेरानहून संध्याकाळी १६:०० वाजता सुटेल आणि नेरळला संध्याकाळी १८:४० वाजता पोहोचेल.

२) अमन लॉज ते माथेरान शटल सेवा (दररोज)

सकाळी : ०८:४५, ०९:३५

दुपारी : १२:००, १४:२५, १५:४०

संध्याकाळी : १७:४५

३) माथेरान ते अमन लॉज शटल सेवा (दररोज)

सकाळी : ०८:२०, ०८:३८, ०९:१०, ०९:२८, ११:३५

दुपारी/संध्याकाळी : १४:००, १५:१५, १५:३३, १७:२०

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news