Mumbai Lakes Survey : तलावांतील गाळाचा वापरायोग्य पाण्यावर परिणाम नाही

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांचे सर्वेक्षण; किरकोळ गाळ साचल्याचा पालिकेचा दावा
Mumbai Lake
Mumbai Lake
Published on: 
Updated on: 

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व तलावांचे सर्वेक्षण करण्यात आले असून पाणीसाठ्याच्या तुलनेत गाळाचे प्रमाण अतिशय किरकोळ आहे. त्यामुळे वापरायोग्य पाण्यावर गाळाचा परिणाम होत नसल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

तुळशी, विहार, तानसा, उर्ध्व वैतरणा, मध्य वैतरणा, मोडकसागर, भातसा या धरणांमधून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. त्यांची एकत्रित क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर इतकी आहे. सध्या ही सर्व धरणे ९९.७० टक्के म्हणजेच जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहेत. जून महिन्यातच हे सर्व तलाव भरू लागल्याने ते गाळामुळे भरले की पाण्यामुळे, असा प्रश्न उपस्थित होत होता.

Mumbai Lake
Mumbai lake overflow : मुंबईचे सातही तलाव शिगोशिग

पवई, तुळशी आणि विहार तलावातील गाळ काढावा व त्यानंतर त्याची वाहतूक व साठवणुकीसंदर्भात अहवाल तीन महिन्यांत तयार करण्याचे निर्देश मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशीष शेलार यांनी दिले आहेत. पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्युटकडून (मेरी) सर्व तलावांचे सर्वेक्षण करून घेण्यात आले. यानुसार तलावांतील गाळ वापरायोग्य पाण्याच्या साठ्याला प्रभावित करत नाही.

कुठे किती गाळ ?

१३० वर्षे जुन्या तानसा तलावात १५ टक्क्यांपेक्षाही कमी गाळ आहे. मोडकसागर तलावात ८ टक्के गाळ आहे. मध्य वैतरणा तलावात २ ते ३ टक्के गाळ आहे. प्रत्येक तलावातील काही भागातील पाणी वापरले जात नाही. हा डेड स्टॉक असतो. तो अद्याप भरलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांसाठी पुरेसे पाणी तलावात साठलेले आहे. पाऊस लवकर सुरू झाल्यानेही ५ ते ६ टक्के अधिक पाणी मिळाले आहे.

Mumbai Latest News

गाळ काढायचा कसा ?

तलावांतील गाळ कसा काढावा यासाठी पालिकेने केंद्रीय जलसंवर्धन संस्थेकडे - मार्गदर्शन मागितले होते. मात्र अशाप्रकारचे काम त्यांनी यापूर्वी केले नसल्यामुळे - मार्गदर्शन उपलब्ध होऊ शकलेले नाही. काही छोट्या गावांमध्ये लहान धरणे उन्हाळ्यात कोरडी पडल्यावर गाळ काढला जातो. मात्र मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा सुरू असल्याने तलाव कधीही रिकामे होत नाहीत व गाळ काढणे शक्य होत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news