Mumbai Accident News: पहिलीच भेट ठरली शेवटची! लक्झरी बसची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू, तरुणी जखमी

लक्झरी बसने त्याच्या दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला असून तरुणी जखमी झाली आहे. ही त्यांची पहिलीच भेट शेवटची ठरली.
Mumbai Accident News
Mumbai Accident Newsfile photo
Published on
Updated on

मुंबई: सोशल मिडीयावर ओळख झाल्यानंतर लग्नासंदर्भात बोलणी करण्यासाठी ते दोघे अंधेरीत भेटले. त्यानंतर दुचाकीने जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरून (जेव्हीएलआर) जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. लक्झरी बसने त्याच्या दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला असून तरुणी जखमी झाली आहे. ही त्यांची पहिलीच भेट शेवटची ठरली.

दीपेन जैन असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून जोगेश्वरी पोलिसांनी लक्झरी चालकाविरोधात गुन्हा नोंद करीत अटक केली आहे.

Mumbai Accident News
Pen Ganesh idol export: पेणच्या गणेशमूर्तींचा निर्यातीचा समुद्र प्रवास सुरू; 4 लाख गणेशमूर्ती परदेशात पोहोचणार

अपघातात जखमी तक्रारदार तरुणी ही नालासोपारा येथे राहते. सहा महिन्यांपूर्वी तिची एका ॲप्सच्या माध्यमातून दीपेनसोबत ओळख झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या संपर्कात होते. मने जुळल्याने एकमेकांना भेटून लग्नाची तारीख निश्चित करण्याचे त्यांनी ठरवले होते.

ठरल्यानुसार रविवारी दुपारी दीपेन हा तरुणीला अंधेरी रेल्वे स्थानक येथे भेटला. त्यानंतर ते मोटारसायकलवरून जुहू येथे गेले. तेथे काही वेळ गप्पा मारल्यानंतर ते आरे कॉलनी येथून अंधेरीच्या दिशेने निघाले.

रात्री पावणे आठच्या सुमारास ते मोटारसायकलने जेव्हीएलआर पुलावरून जात होते. त्याचवेळी लक्झरी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्या धडकेत ते दोघे गंभीर जखमी झाले. जखमी तरुणी ही काहीअंतर फरफटत गेली. तर बसचे चाक दीपेनच्या डोक्यावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र तेथे डॉक्टरांनी दीपेनला मृत घोषित केले.

Mumbai Accident News
Bahadoli Jamun GI Tag: बहाडोलीने लिहिली जांभळाच्या गोडीतून यशाची नवी कहाणी

पळून गेलेल्या बसचालकाला अटक

अपघातानंतर बसचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा स्थानिक रहिवाशांनी त्याला पकडले. या घटनेची माहिती समजताच जोगेश्वरी पोलीस घटनास्थळी आले. त्ाला ताब्यात घेत गुन्हा नोंद करीत अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news