Mumbai IVF Treatment: मुंबई महापालिका रुग्णालयांत अल्पदरात IVF उपचाराचा मार्ग मोकळा; वंध्यत्वग्रस्त दांपत्यांना दिलासा

महागड्या उपचारांना पर्याय उपलब्ध होणार; पालिकेचा सकारात्मक प्रतिसाद, लवकरच निर्णय अपेक्षित
Mumbai IVF Treatment
Mumbai IVF TreatmentPudhari
Published on
Updated on

मुंबई : महागडी आयव्हीएफ इन विट्रो फर्टिलायझेशन ही उपचार पद्धती महापालिका रुग्णालयांत अल्पदरात उपलब्ध करून देण्याचा ठराव मुंबई महापालिका सभागृहात मांडण्यात आला आहे. याबाबत पालिका प्रशासन सकारात्मक असल्यामुळे महापालिका हॉस्पिटलमध्ये लवकरच ही उपचार पद्धत उपलब्ध होणार आहे.

Mumbai IVF Treatment
Navi Mumbai Budget: नवी मुंबई महापालिकेचा 6,704 कोटींचा अर्थसंकल्प सादर; करवाढ नाही, विकासकामांसाठी कर्जरोखे मार्ग

मुंबई शहरातील धावपळीचे जीवन, वाढता ताणतणाव, बदलती जीवनशैली, विवाहाचे वाढते वय, वाढता स्थूलपणा यासह अन्य कारणांमुळे अनेक दांपत्यांना अपत्यप्राप्तीची समस्या निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा दांपत्यांना वंध्यत्वामुळे, मानसिक घुसमट, नैराश्य, कुटुंबीय व नातेवाईकांकडून वारंवार चौकशी-टोमणे यांचा सामना करावा लागतो. देशात आयव्हीएफ ही उपचार पद्धती गेल्या 45 वर्षांतील सर्वात मोठी वैद्यकीय क्रांती असून, अनेक जोडप्यांसाठी अपत्यप्राप्तीकरिता एक आशेचा किरण बनला आहे. मात्र या उपचार पद्धतीत प्रति सायकल दीड ते अडीच लाख इतका खर्च येत असल्याने, अनेक दांपत्य अशा उपचारापासून वंचित रहावे लागत असल्याकडे भाजपाच्या नगरसेविका शितल गंभीर यांनी महापालिका सभागृहाचे लक्ष वेधले होते.

Mumbai IVF Treatment
Gadchiroli Naxal Surrender: हिंसेचा मार्ग सोडून विकासाकडे; 794 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून सुरू केले नवे आयुष्य

आयव्हीएफ उपचार पद्धत महागडी असल्यामुळे गोरगरिब जनतेला आर्थिक अडचणीमुळे उपचार अर्धवट सोडून द्यावे लागतात. त्यामुळे अनेकांना अपत्यप्राप्ती होत नाही. यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये अपत्य प्राप्तीसाठी अडचणी येत असलेल्या गोरगरीब व आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या दांपत्यांना आयव्हीएफ उपचार पद्धतीची सुविधा अल्पदरात उपलब्ध करून देण्यात यावी, असा ठराव भाजपाकडून महापालिका सभागृहात मांडण्यात आला होता.

Mumbai IVF Treatment
Tushar Gandhi Mumbai University: तुषार गांधींना मुंबई विद्यापीठात प्रवेश नाकारला; प्रशासनावर टीकेची झोड

याला मंजुरी देण्यात आली असून त्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी तो महापालिका प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाने अशा प्रकारच्या उपचार पद्धतीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या उपचार पद्धतीचा सविस्तर अभ्यास करून, कमीत कमी खर्चामध्ये ही उपचार पद्धत उपलब्ध करता येईल का, याचा अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news