HSRP Number Plate: उद्यापासून एचएसआरपी नंबर प्लेट नसेल तर कारवाई होणार : परिवहन मंत्री

केंद्र व राज्य शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) अनिवार्य केली आहे. उद्यापासून एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे.
Pratap Sarnaik
Pratap Sarnaikfile photo
Published on
Updated on

HSRP number plate

मुंबई: उद्यापासून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बंधनकार असेल. याआधी पाच वेळा मुदतवाढ दिली असून पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही, आता ठोस कारवाई केली जाणार, असे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज (दि. ३०) स्पष्ट केले.

१ एप्रिल २०१९ नंतरच्या नव्या वाहनांना कंपनीकडून नंबर प्लेट मिळत होती. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत झालेल्या सर्व वाहनांना आता (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र शहरातील अनेक वाहने हे विना एचएसआरपी नबंरप्लेटशिवाय धावत आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही एचएसआरपी नबंर प्लेटबाबत वाहनधारकांमध्ये उदासीनता दिसून येत असून, आज (दि. ३०) जून रोजी नंबरप्लेट बसविण्याची मुदत संपत आहे.

Pratap Sarnaik
Sachin Ahir Operation Tiger: ऑपरेशन टायगर ३.० चा पहिला वार... ठाकरेंचे विश्वासू सचिन अहिर यांना शिंदेंकडून उपसभापतीची उमेदवारी

परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबर २०१९ अखेर सुमारे १४ लाख ६७ हजार ७४२ वाहने नोंदणीकृत होती. या वाहनांना सुरक्षेच्या दृष्टीने एचएसआरपी नबंर प्लेट बसविणे बंधनकारक आहे. आधिकृत आकडेवारीनुसार, नोंदणीकृत वाहनांपैकी १० जून २०२६ पर्यंत केवळ ६ लाख २८ हजार ६२४ वाहनमालकांनी एचएसआरपी बसविण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यामधील केवळ ५ लाख २६ हजार ७२० वाहनांवरच प्रत्यक्ष एचएसआरपी बसविण्यात आली आहे. सुमारे ८ लाख ३९ हजार वाहनांनी एचएसआरपीसाठी अद्याप नोंदणीच केली नाही.

नोंदणी केलेल्या वाहनधारकांना अद्याप नबंर प्लेट बसवून घेतलेली नाही. शहरात अजूनही लाखो वाहने एचएसआरपी नंबरप्लेटविना रस्त्यावर धावत आहे. अनेकदा मुदतीवाढ देऊनही निम्म्याहून अधिक वाहन चालकांनी ही प्रकिया पूर्ण केली नसल्याचे आकडेवारीवरुन निर्देशनास येत आहे.

Pratap Sarnaik
Raj Thackeray: राम मंदिरातील गैरव्यवहारावर पंतप्रधानांचं मौन का? भक्तांच्या पैशांचा हिशेब कोण देणार? राज ठाकरेंचा सवाल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news