Mumbai Hit And Run : वरळी प्रकरणात राजेश शहांना पोलिसांकडून अटक

फरार संशियत आरोपीने अपघावेळी केले होते मद्यसेवन
Warli Heat And Run Case
मुंबई हिट अँड रन प्रकरण Pudhari File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई हिट अँड रन प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. अपघातापूर्वी काही वेळापूर्वी आरोपी मिहीर शाह मित्रांसोबत एका बारमध्ये गेल्याचे समोर आले आहे. जिथे त्याने त्याच्या मित्रांसोबत हजारो रुपयांचे मद्य पिल्याचे बिल सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अपघात झाला त्यावेळी राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा गाडी चालवत होता. राजेश शहा हे पालघरमधील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. तसेच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकटवर्तीय देखील मानले जातात. पोलिसांनी आरोपीच्या मिहीर शहा याला देखील अटक केली आहे.मिहीर शहा आणि चालक दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रविवारी (दि.7) मुंबईतील वरळी परिसरात शिवसेना नेत्याच्या मुलगा मिहीर शाहने दुचाकीवरून जात असलेल्या महिलेला त्याचा बीएमडब्ल्यू कारने धडक दिली. यामध्ये अपघातात महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा पती जखमी झाला आहे. अपघातानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या अपघातात नवी माहिती समोर आली आहे. अपघातापूर्वी काही वेळापूर्वी आरोपी मिहिर शाह त्याच्या मित्रांसोबत एका बारमध्ये गेला होता, अशी माहिती मिळाली आहे. जिथे दारूचे सेवन केले जात होते. मात्र, अपघाताच्या वेळी मिहीर दारूच्या नशेत होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.

Warli Heat And Run Case
वरळी हिट अँड रन प्रकरणी कडक कारवाई होईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

घटनेच्या वेळी फरार संशयित आरोपी मिहीर शाह दारूच्या नशेत असल्याचा पोलिसांना संशय आहे. तो अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. वरळी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कार मालक आणि आरोपीचे वडील राजेश शहा आणि प्रवासी राजश्री राजेंद्र सिंह बिदावत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. राजेश शहा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आहेत.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कायदा सर्वांसाठी समान असून कोणालाही सोडले जाणार नाही. या अपघातात सहभागी व्यक्ती शिवसेना नेत्याचा मुलगा आहे का, असे विचारले असता शिंदे म्हणाले, “कायदा सर्वांसाठी समान असून सरकार प्रत्येक प्रकरणाकडे एकाच दृष्टिकोनातून पाहते. या अपघातासाठी वेगळे नियम असणार नाहीत. सर्व काही कायद्यानुसार केले जाईल.”

Warli Heat And Run Case
मुंबई : वरळीत हिट अँड रन; महिलेचा मृत्यू, कारचालक फरार

अपघाताच्या वेळी मिहीर मद्यधुंद अवस्थेत

बार मालक करण शाह यांच्या म्हणण्यानुसार, मिहिर शाह शनिवारी (दि.7) रात्री 11:00 च्या सुमारास जुहू येथील व्हॉईस ग्लोबल तापस बारमध्ये त्याच्या मित्रांसोबत पार्टी करत होता. त्याने सांगितले की, मिहीर त्याच्या मित्रांसह बारमध्ये आला होता. त्याच्यासोबत एकही महिला नव्हती. पहाटे 1:40 वाजता बिल भरल्यानंतर ते कारमधून निघाले. "पोलिसांनी सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला आहे. या बारमध्ये मिहीर शाहचे बिल 18730 रुपये इतके झाले होते. दरम्यान, मिहीर शहा यांचे वडील आणि पालघर जिल्ह्यातील शिंदे सेनेचे उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या नावावर बीएमडब्ल्यू कार नोंदणीकृत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news