Mumbai rains:
मुंबई: काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे रूळांवर पाणी साचायला सुरूवात झाली असून तिन्ही रेल्वे मार्गांवरील लोकल सेवा उशिराने धावत आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. हवामान विभागाने पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. (Mumbai Rain)
रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे दादर आणि परळ सारख्या भागांमध्ये वाहतूक मंदावली आहे. यामुळे मुंबईकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकल वाहतुकीची स्थिती पाहता रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली असून, लोकल मात्र उशिरा धावत आहेत.