Mumbai Rain: मुंबईत मान्सूनपूर्व पावसाचा जोर; वर्सोवा येथे सर्वाधिक ६९ मिमी पावसाची नोंद

मान्सूनपूर्व पावसाने सकाळी कामावर निघालेल्या मुंबईकरांना अक्षरश: झोडपून काढले.
Mumbai Rain
Mumbai Rainfile photo
Published on
Updated on

मुंबई: मुंबई उपनगरात बुधवारी सकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. मान्सूनपूर्व पावसाने सकाळी कामावर निघालेल्या मुंबईकरांना अक्षरश: झोडपून काढले. वर्सोवामध्ये सर्वाधिक ६९ मिमी पाऊस झाला.

मुंबई बुधवारी सकाळी अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. पश्चिम उपनगरात पावसाचा जोर जास्त होता त्यामुळे अंधेरी सबवे येथे पाणी तुंबले. त्यामुळे सकाळी ७.४० वाजल्यानंतर येथील वाहतूक बंद करण्यात आली.

Mumbai Rain
Maharashtra Road Development: 3,500 किमी रस्त्यांसाठी 6,429 कोटी'; मंत्रिमंडळात मंजुरी

कूपर हॉस्पिटल, अंधेरी पूर्व, सांताक्रुझ आदी भागातही मोठा पाऊस झाला. त्यामुळे ठिकठिकाणी सकल भागात पाणी तुंबले होते. पण सकाळी कामावर निघण्याच्या वेळी जोरदार पाऊस आल्यामुळे मुंबईकरांनी भिजत भिजतच आपले कार्यालय गाठले.

शहर - ०.९६

पूर्व उपनगर - १.८५ मिमी

पश्चिम उपनगर - ९.८४ मिमी

सर्वाधिक पाऊस वर्सोवा -६९ मिमी,

कूपर हॉस्पिटल -५२ मिमी

अंधेरी पूर्व -४९ मिमी

अंधेरी पश्चिम -४६ मिमी

मालपा डोंगरी -३९ मिमी

Mumbai Rain
Mumbai Ahmedabad Bullet Train: बुलेट ट्रेनच्या तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे भुयारीकरण पूर्ण

विलेपार्ले -३३ मिमी

सांताक्रूझ -३० मिमी

चकाला - १७ मिमी

बीकेसी - १६ मिमी

काळा किल्ला - १० मिमी

चेंबूर -१२ मिमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news