Mumbai temperature : मुंबईत उष्णतेची लाट

कमाल तापमान 38 अंशांवर
Mumbai temperature
मुंबईत उष्णतेची लाटpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबईसह आजुबाजूच्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट दिसून आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) माहितीनुसार, गुरुवारी मुंबईतील तापमान 38 अंश सेल्सिअसवर गेले.

गेले दोन दिवस मुंबईतील तापमान चाळीशीच्या घरात आहे. सरासरीपेक्षा 5 अंश सेल्सिअस जास्त तापमान नोंदले गेले. बुधवारच्या (23/37 अंश सेल्सिअस) तुलनेत कमाल तापमानात एका अंशाने वाढ झाली. शुक्रवारीही सरासरी 37 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.

गुरुवारच्या (38 अंश सेल्सिअस) तापमानाने 2026मधील सर्वाधिक तापमानाची नोंद केली. सांताक्रूझ वेधशाळेमध्ये मार्च महिन्यातील सर्वाधिक दिवसाचे तापमान 41.7 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. 28 मार्च 1956 रोजीचे हे विक्रमी तापमान आहे.

Mumbai temperature
US-Israel-Iran War : आखाती देशातून आतापर्यंत 2730 प्रवासी परतले!

सलग दोन दिवस तापमान 37 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक असते आणि सरासरी तापमानापेक्षा किमान 4.5 अंश सेल्सिअस तापमान कमी होते तेव्हाच उष्णतेची लाट जाहीर केली जाते.

सकाळच्या वेळी कडक ऊन जाणवत असल्याने दादर चौपाटीसह वरळी सी-फेस सारख्या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांची संख्या घटली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेक जण टोपी, गॉगल्स आणि पाण्याच्या बाटल्या सोबत घेऊन फिरताना दिसत आहेत.

Mumbai temperature
Israel US Iran War | अमेरिकन तेल टँकरवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला

दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे, पुरेसे पाणी पिण्याचे आणि उष्णता टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने नागरिकांना केले आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news