

मुंबई: पुढील दोन दिवस (4 आणि 5 मार्च) कमाल तापमान चाळिशीच्या घरात जाण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) असून मुंबईकरांना मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसणार आहे.
मुंबई आयएमडीच्या सांताक्रुझ वेधशाळेच्या साप्ताहिक फोरकास्टनुसार, मंगळवारी मुंबईत किमान 22 आणि कमाल 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारच्या तुलनेत तापमान प्रत्येकी 2 अंश सेल्सिअसनी वाढले. पुढील दोन दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 4 आणि 5 मार्चला कमाल तापमान 36 अंशांवर जाऊ शकते. तसे झाल्यास बुधवार हा यंदाच्या (2026) वर्षातील सर्वात उष्ण दिवस असेल. गुरुवारी त्याचीच पुनरावृत्ती अपेक्षित आहे.
मार्च महिना उजाडताच राज्यातील कमाल तापमानाचा पारा वाढण्यास सुरुवात झाली असून, राज्याचे सरासरी कमाल तापमान 35 ते 38 अंशांवर गेले आहे. दरम्यान, बुधवार (दि. 4) पासून यात 2 ते 3 अंशांनी वाढ होईल, असा अंदाज शास्त्रज्ञांनी दिला आहे.
अकोला 38.5, मुंबई 30.7, पुणे 35.3, अहिल्यानगर 35, जळगाव 36.5, कोल्हापूर 34.7, महाबळेश्वर 30, मालेगाव 35.6, नाशिक 35.4, सांगली 36.4, सातारा 35.6, सोलापूर 37.9, धाराशिव 34.9, छत्रपती संभाजीनगर 35, परभणी 36.3, नांदेड 36.5, अमरावती 38.2, बुलडाणा 36, ब्रह्मपुरी 37, चंद्रपूर 36.2, गोंदिया 34.4, नागपूर 35.8, वाशिम 37.2, वर्धा 38, यवतमाळ 35.