Mumbai Hawkers Protest: फेरीवाल्यांचा आझाद मैदानात मोर्चा; कारवाईविरोधात मुंबईत मोठे आंदोलन

2014 च्या फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी; शहर व उपनगरांतील सुमारे 3 हजार फेरीवाले सहभागी होणार
Mumbai Hawkers Protest
Mumbai Hawkers ProtestPudhari
Published on
Updated on

मुंबई : महापालिका व पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाई विरोधात मुंबईतील फेरीवाले बुधवारी आझाद मैदानात एकवटणार आहेत. सुरू असलेली कारवाई अन्यायकारक असून राज्यभर एकाचवेळी आंदोलन करण्यात येणार असल्याचे जनवादी हॉकर्स सभेने जाहीर केले आहे.

Mumbai Hawkers Protest
Sassoon Dock Modernization: ससून डॉकचे होणार आधुनिकीकरण; फिनलंडच्या कंपन्यांसोबत राज्य सरकारचा करार

फेरीवाल्यांना रोजगाराचे संरक्षण मिळावे व 2014 च्या फेरिवाला कायद्याची अंमलबजावणी व्हावी अशी त्यांची मागणी आहे. मुंबईतील आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनात शहर व उपनगरांतील सुमारे 3 हजार फेरीवाले सहभागी होतील, अशी माहिती सभेचे राज्यसचिव के.नारायणन व राज्य कौन्सिल सदस्य शैलेंद्र कांबळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मनोज यादव हेही उपस्थित होते.

Mumbai Hawkers Protest
Women Day Special Stories: स्वकर्तृत्वाने देशपातळीवर झळकलेल्या मराठी महिला; विविध क्षेत्रांत महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल

सातत्याने फेरीवाल्यांवर महापालिका व पोलीस प्रशासन अन्याय करीत आहे. गेल्या 25 ते 30 वर्र्षांपासून हा लढा सुरू आहे. फेरीवाल्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने कायदा पास केला आहे. मात्र या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, असे यावेळी के. नारायणन यांनी सांगितले.

Mumbai Hawkers Protest
Women Day Special Stories: लावणी कलाकारांची शिक्षणाकडे वाटचाल; कलेसोबत पदवी-पदव्युत्तर शिक्षणाची जिद्द

फेरीवाले मराठीच, बांगलादेशी असल्याचा कांगवा

मुंबईतील सर्व फेरीवाले हे मराठीच आहेत.पण सरकार व महापालिका प्रशासनाला काही फेरीवाले हे बांगलादेशी आहेत, अशी चुकीची माहिती कोणीतरी देत आहेत. मुंबई महापालिकेने 2014 ला फेरीवाल्यांचा सर्व्हे केला आहे. हा सर्व्हे तपासला तर किती बांगलादेशी फेरीवाले आहेत, हे सत्य बाहेर येईल. फेरीवाल्यांबाबत आमदार अमित साटम व महापौर रितू तावडे यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून सातत्याने कारवाई सुरू असल्याचे शैलेंद्र कांबळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news