मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी रविवारी 12 ऑक्टोबरला हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण स्थानकांदरम्यान लोकलसेवा सुरळीत राहणार आहे.
कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान वाहतूक सकाळी 11.10 ते दुपारी 16.10 वाजेपर्यंत बंद राहील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.34 वाजल्यापासून ते दुपारी 15.36 वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या तसेच पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 10.17 वाजल्यापासून ते दुपारी 15.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला आणि पनवेल-वाशी या दरम्यान विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येतील. ब्लॉकच्या कालावधीत सकाळी 10.00 वाजल्यापासून ते सायंकाळी 18.00 वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान प्रवास करता येईल.