Mumbai Ghatkopar Murder : रात्रीचा फेरफटका बेतला जिवावर; महिलेची हत्या

घाटकोपरमध्ये पैशांच्या वादातून खून; आरोपीला 24 तासांत अटक
Murder Case
Murder CasePudhari
Published on
Updated on

मुंबई : घाटकोपर पूर्वेतील रायझिंग सिटी परिसरात पैशांच्या वादातून अमीनाबी सिद्दीकी या ४१ वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक केली आहे.

घाटकोपर पूर्वेतील रायझिंग सिटी केटी ९ मध्ये राहणारी अमीनाबी सिद्दीकी (४१) ही महिला २४ डिसेंबर रोजी रात्री नेहमीप्रमाणे रात्रीचा फेरफटका करण्यासाठी घराबाहेर पडली. मात्र बराच वेळ होऊनही ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. अखेर त्यांनी पंतनगर पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम हाती घेतली. २५ डिसेंबरला सकाळच्या सुमारास रायझिंग सिटीमधील केडी ९ समोरील झुडपात महिलेचा मृतदेह आढळून आला.

Murder Case
Mumbai Murder News : नालासोपाऱ्यात कौटुंबिक वादातून पत्नीची निर्घूण हत्या

मृतदेह धारदार शस्त्राने गळा चिरलेल्या अवस्थेत असल्याने हा खून अत्यंत निघृण पद्धतीने करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पंतनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार यांच्या नेतृत्वाखाली तब्बल १५ अधिकाऱ्यांची तपास पथके तयार करण्यात आली. पोलीस निरीक्षक अजित गोंधळी, अस्लम खतीब, राजेश चंदूगडे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दगडू जाधव, प्रशांत कुंभार, राजेंद्र गायकवाड यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल तांत्रिक तपास, साक्षीदारांची चौकशी तसेच संशयितांच्या हालचालींचा सखोल अभ्यास केला. तपासादरम्यान मोहम्मद इरफान उर्फ चांद फकरे आलम अन्सारी (वय ४०, रा. कामराज नगर रायझिंग सिटी ८, घाटकोपर पूर्व) याच्यावर संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन केलेल्या कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

3 लाखांसाठी गळा चिरला !

मयत महिलेने आरोपी मोहम्मद इरफानच्या पत्नीकडून ३ लाख रुपये उसने घेतले होते. मात्र ते पैसे ती परत देत नसल्याने त्याचा राग त्याच्या मनात होता. त्यामुळे त्याने सदर महिलेवर पाळत ठेऊन रात्रीच्या वेळी धारदार शस्त्राने हल्ला करून तिचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याला न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पंतनगर पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news