

नालासोपारा ( मुंबई) : विरार पश्चिमेतील एम.बी. इस्टेट परिसरात एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून पती आणि नणंद यांनी संगनमत करून पत्नीची हातोड्याने निर्घूण हत्या केल्याचा प्रकार समोर आला असून, घटनेनंतर ती बाथरूममध्ये घसरून पडल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पोलिसांच्या सतर्क तपासामुळे हा बनाव उघड झाला आहे. याप्रकरणी पती आणि नंनदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
ही घटना शुक्रवारी ( दि.26) रोजी मध्यरात्री संगम सोसायटीत घडली. मृत महिलेची ओळख कल्पना सोनी (३६) अशी झाली आहे. कल्पनाचा विवाह सन २०१५ मध्ये जयंतीलाल सोनी (३८) याच्याशी झाला होता. विवाहानंतर दहेज तसेच कौटुंबिक कारणांवरून वारंवार वाद होत असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी ( दि.27) सकाळी कल्पना, तिचा पती जयंतीलाल आणि नणंद दीपाली सोनी यांच्यात जोरदार भांडण झाले. वाद इतका टोकाला गेला की, पती आणि नणंद यांनी मिळून कल्पनावर हातोडा व इतर घातक शस्त्रांनी हल्ला केला. या गंभीर हल्ल्यात विवाहितेच्या डोक्यावर, पाठीवर आणि अन्य ठिकाणी वार केल्याने कल्पनाचा जागीच मृत्यू झाला.
विरार पश्चिमेतील एम.बी. इस्टेट परिसरात एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून पती आणि नणंद यांनी संगनमत करून पत्नीची हातोड्याने निघृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला असून, घटनेनंतर ती बाथरूममध्ये घसरून पडल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पोलिसांच्या सतर्क तपासामुळे हा बनाव उघड झाला आहे. याप्रकरणी पती आणि नंनदेविर ोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.