Mumbai Ganeshotsav Police Security: गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; १६ हजार ८०० अधिकारी-कर्मचारी तैनात

मुंबईत गणेशोत्सव सुरक्षित पार पडण्यासाठी १६ हजार ८०० अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. क्यूआरटी, दंगल नियंत्रण पथके आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून विसर्जन मार्गांवर विशेष नजर ठेवली जाणार आहे.
Mumbai Ganeshotsav Police Security
Mumbai Ganeshotsav Police SecurityPudhari
Published on
Updated on

मुंबई: गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू असतानाच मुंबईकरांचा उत्सव सुरक्षित आणि निर्भय वातावरणात पार पडावा, यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. मुंबई शहर व उपनगरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव, विसर्जन स्थळे, चौक , सार्वजनिक ठिकाणे, वर्दळीच्या सर्वत्र पोलिसांनी सुरक्षेसाठी बंदोबस्त ठेवला असून

गणेशोत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्था, गर्दीचे नियमन आणि नागरिकांची सुरक्षितता यासाठी ७ अतिरिक्त पोलीस आयुक्त, ३७ पोलीस उपायुक्त, ५२ सहायक पोलीस आयुक्तांसह २ हजार ६५० पोलीस अधिकारी आणि १४ हजार १५० पोलीस कर्मचारी, असे एकूण १६ हजार ८०० अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Mumbai Ganeshotsav Police Security
Mumbai Rain: मुंबई परिसरात मुसळधार; वसई-विरार शहर जलमय

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळे, दर्शनासाठी गर्दी होणारी ठिकाणे, प्रमुख रस्ते, रेल्वे स्थानके व विसर्जन मार्गांवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. नागरिकांना सुरक्षितपणे दर्शन घेता यावे, यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यांच्या पातळीवरही अतिरिक्त नियोजन करण्यात आले आहे.

क्यूआरटी, दंगल नियंत्रण पथकेही सज्ज

मुंबई पोलिसांच्या नियमित बंदोबस्तासोबतच महत्त्वाच्या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी), दंगल नियंत्रण पथके आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. एखाद्या ठिकाणी अचानक गर्दी वाढल्यास किंवा कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने प्रतिसाद देता यावा, यासाठी ही विशेष पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.

Mumbai Ganeshotsav Police Security
GSB Mahaganpati Mumbai: चारशे किलो सोने-चांदीच्या दागिन्यांनी नटला मुंबईतील ‘जीएसबी’चा महागणपती

विसर्जनासाठी आराखडा

गणेशमूर्ती विसर्जनाचा दिवस पोलिसांसाठी सर्वाधिक आव्हानात्मक असतो. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी स्वतंत्र सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी अतिरिक्त सुरक्षा मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे. मोठ्या गणेश मंडळांच्या मिरवणुका, विसर्जन घाटांवरील गर्दी आणि वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन पोलिस व वाहतूक पोलिसांमध्ये समन्वय ठेवण्यात येणार आहे.

वाहतूक पोलिसांकडून विसर्जन मार्गांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, गरजेनुसार वाहतूक वळविणे, वाहनांची कोंडी टाळणे आणि मिरवणुकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईतील प्रमुख विसर्जनस्थळांवर गर्दीचा ताण वाढू नये, यासाठी परिस्थितीनुसार वाहतूक व्यवस्थेत बदल केले जाणार आहेत.

संशयास्पद वस्तू आढळल्यास तत्काळ माहिती द्या

नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी संयम बाळगून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. बेवारस किंवा संशयास्पद वस्तू आढळल्यास स्वतःहून हाताळू नये; असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलीस मदतीसाठी नागरिकांनी १०० किंवा ११२ या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नवी मुंबईतही पोलिसांचा चोख बंदोबस्त

नवी मुंबईत गणेशोत्सवात डीजेवर बंदी घालण्यात आली आहे. सर्व पोलिस ठाण्यात ध्वनिप्रदूषण विरोधी पथक तयार करण्यात आले आहे. सर्व गणेशमूर्ती विसर्जन घाटावर पोलिस आणि महापालिकेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष कॅमेऱ्यांची व्यवस्था केली आहे.

या काळात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्यासाठी सात पोलिस उपायुक्त, १३ सहाय्यक पोलिस आयुक्त, ७० पोलिस निरीक्षक, २३५ सहाय्यक पोलिस निरीक्षक-पोलिस उपनिरीक्षक, २,१२८ पोलिस अंमलदार तैनात ठेवण्यात येणार आहे. २० स्ट्रायकिंग फोर्स, क्युआरटी-२ फ्लाटून, आरसीपी-२ फ्लाटून, २०० होमगार्ड, १४८ ट्राफिक वॉर्डन, ३० एमएसएफ अमंलदार असा बंदोबस्त ठेण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news