Mumbai Ganeshotsav 2026 : बाप्पाचा नवा बॅलन्सिंग अवतार

सार्वजनिक मंडळांमध्ये तोल सांभाळणार्‍या मूर्तींची क्रेझ
Mumbai Ganeshotsav 2026
Mumbai Ganeshotsav 2026pudhari photo
Published on
Updated on

गिरगाव : मिलिंद कारेकर

यंदाच्‍या मुंबईतील गणेशोत्‍सवात आपला ताल- तोल सांभाळत मूर्तीकार साकारेल तशी कसरत करणाऱ्या गणेशमूर्तीचे प्रमाण वाढले आहे. आधी कागागिर आणि आता गणेशमंडळेही या मूर्तींना बॅलन्सिंग बाप्‍पा म्‍हणू लागले आहेत. गतवर्षी एखादी दुसरी अशी कवायत करणारी मूर्ती होती. तिथे यंदा अशा मूर्तींची संख्‍या शंभरच्‍या पुढे गेली आहे.

प्रख्यात मूर्तिकार अरुण दत्ते पुढारीशी बोलताना म्हणाले, यावर्षी जवळजवळ पन्नास एक बॅलन्सिंग मूर्तींच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. परळचा महाराजा गेल्या वर्षी बॅलन्सिंग स्वरुपात साकारल्याने तो सर्वांच्या मनात रुजला. परळचा महाराजाची ही गणेश मुर्ती तब्‍बल ५० डिग्रीपर्यत झुकलेली होती. त्‍याचा परिणाम असा झाला की, यंदा मुंबई, पुणे, कोल्हापूर या शहरांसह गुजरातच्‍या काही शहरांतून तसेच राजस्थानमधील कोटा शहरातूनही मुंबईतील कारागिरांना बॅलन्सिंग बाप्‍पांच्‍या मूर्तीं तयार करण्‍याच्‍या ऑर्डर आल्या.

Mumbai Ganeshotsav 2026
Mumbai Crime : माथाडी युनियनच्या नावाखाली दहशत; खंडणीखोर टोळीवर ‘मोक्का’

अशा बॅलन्सिंग मूर्ती त्या त्या शहरांकडे रवानाही झाल्या आहेत. लालबाग परळ येथील प्रख्यात मूर्तिकार विजय खातू यांच्याकडे दत्ते यांनी मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. या वर्षी देखील परळचा महाराजाची गणेश मूर्ती बॅलन्सिंग स्वरुपात असली तरी ती मूर्ती ३० डिग्रीपर्यंत झुकलेली आहे.

कोकणातील होळी शिमग्याचा सण राज्यात प्रसिद्ध आहे. या सणाला ग्रामदेवतांच्या प्रतिमा पालखी ठेवून ती पालखी गावकऱ्यांकडून अंगा खांद्यावर आणि डोक्यावर नाचवण्याची प्रथा परंपरा आहे. याच प्रथेवर आधारित गणपती स्वतः:च्या डोक्यावर देवी देवतांची पालखी नाचवत असल्याची २२ फूट उंच मूर्ती घडवण्याचे काम मूर्तिकार सिद्धांत मोहिते यांनी यंदा केलेे.

या मूर्तीचे फोटो -व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. परळला रेल्वे वर्क शॉपच्या पुढे गेल्यावर मारु हॉस्पिटलच्या गल्लीलगतच्या मैदानावर अरुण दत्ते यांची कार्यशाळा आहे. त्याच ठिकाणी यंदा ५० बॅलन्सिंग मूर्तींची नोंदणी सार्वजनिक उत्सव मंडळांकडून करण्यात आली.

  • बॅलन्सिंग मूर्तीबाबत सार्वजनिक उत्सव मंडळांची मागणी वाढत असली तरी केवळ २५ फुटांपर्यतच बॅलन्सिंग मूर्ती बनविण्याची मूर्तिकारांची तयारी आहे.

  • याहून अधिक मोठ्या बॅलन्सिंग मूर्ती बनविणे अवघड असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.

  • बॅलन्सिंग मूर्तींबाबत कोणतीही दुर्घटना घडू नये म्‍हणून मूर्तिकार धोका पत्करण्यास तयार नाहीत.

Mumbai Ganeshotsav 2026
Navi Mumbai Vegetable Prices : भाजीपाल्याच्या दरात घसरण

यावर्षी चार-पाच मंडळाच्या बॅलन्सिंग मूर्ती घडवल्या आहेत. पण त्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. कारण त्या ५० डिग्रीपर्यंत झुकलेल्या स्थितीमध्ये घडवाव्या लागतात. बॅलन्सिंग मूर्तीच्या आगमन आणि विसर्जन सोहळ्याला जास्त काळजी घ्यावी लागते.

मुकेश वालावलकर, श्री कलाधिपती आर्टसचे मूर्तिकार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news