Mumbai non AC local train Trail: स्वयंचलित दरवाजाच्या पहिल्या 'नॉन-एसी' लोकलची चाचपणी

१२ डब्यांच्या लोकलची उपनगरीय रेल्वे मार्गांवर चाचणी सुरू; चाचणी यशस्वी झाल्यानंतर नियमित सेवेत दाखल करण्याचा निर्णय.
Mumbai non AC local train Trail
Mumbai non AC local train TrailPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: मुंबईकरांचा उपनगरीय लोकल प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार, स्वयंचलित दरवाजे असलेली मुंबईतील पहिली 'नॉन-एसी' लोकल ट्रेन शहरात दाखल झाली आहे.

१२ डब्यांच्या या अत्याधुनिक रेकची सध्या मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या विविध मार्गांवर चाचणी सुरू आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतरच या गाडीला मध्य रेल्वेच्या नियमित प्रवासी सेवेत दाखल करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

गेल्या वर्षी ९ जून २०२५ रोजी दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान झालेल्या अपघातात धावत्या लोकलच्या उघड्या दरवाजातून पडून ५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर ९ जण गंभीर जखमी झाले होते. या अपघातानंतरच मुंबईत स्वयंचलित दरवाजे असलेली नॉन-एसी लोकल सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला होता.

Mumbai non AC local train Trail
Diwali Muhurat Trading 2026: लक्ष्मीपूजनाला आज शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग; बीएसई-एनएसईचे विशेष सत्र

मुंब्रा अपघाताची चौकशी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पाच सदस्यीय समिती गठीत केली होती. या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट केले होते की, लोकल मधील प्रचंड गर्दी आणि गाड्यांचे उघडे दरवाजे हेच या अपघाताचे मुख्य कारण होते. यावर उपाय म्हणून मेट्रो ट्रेनच्या धर्तीवर लोकललाही 'बंद दरवाजा प्रणाली' सुरू करण्याची शिफारस समितीने केली होती.

Mumbai non AC local train Trail
Harry Boxer: लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हस्तक हॅरी बॉक्सर अमेरिकेत जेरबंद! रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबाराची स्वीकारली होती जबाबदारी

या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईसाठी स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन-एसी लोकल ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.