Mumbai Fire Brigade: 34 मजल्यापर्यंतची आग विझवता येणार! अग्निशमन दलात दाखल होणार 104 मीटर उंच अत्याधुनिक नवीन शिडी

मुंबईतील इमारतीची उंची 50 ते 60 मजल्यापर्यंत पोहोचली आहे. अशा इमारतींमध्ये अंतर्गत अग्निशमन यंत्रणा बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Mumbai Fire Brigade
Mumbai Fire BrigadePudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलामध्ये 104 मीटर उंच ‌‘टर्न टेबल लॅडर‌’ लवकरच दाखल होणार आहे. त्यामुळे 34 मजल्यापर्यंत लागलेली आग विझवणे शक्य होणार आहे. तर दुसरीकडे बचावकार्य करून नागरिकांना सुरक्षित व तातडीने इमारतीमधून बाहेर काढणे अधिक सोयीस्कर होणार आहे.

मुंबईतील इमारतीची उंची 50 ते 60 मजल्यापर्यंत पोहोचली आहे. अशा इमारतींमध्ये अंतर्गत अग्निशमन यंत्रणा बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु अनेकदा ही यंत्रणा काम करत नसल्यामुळे अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य होत नाही.

Mumbai Fire Brigade
Mumbai Water Crisis: मुंबईकरांना पाणीचिंता! तलावांनी गाठला तळ; 17 टक्के साठा शिल्लक

त्यामुळे महापालिकेने जास्तीत जास्त उंचीच्या शिड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अग्निशमन दलामध्ये सध्या 32 मीटर, 40 मीटर, 55 मीटर, 64 मीटर तसेच 90 मीटर उंचीच्या टर्न टेबल लॅडर उपलब्ध आहेत.

मात्र, 90 मीटर लॅडर वारंवार नादुरुस्त होत असल्याने उंच इमारतींमधील आग विझविताना अडचणी निर्माण होत होत्या. यावर उपाय म्हणून महापालिकेने गेल्या वर्षी 104 मीटर उंचीच्या दोन टर्न टेबल लॅडर खरेदी करण्यात येणार आहे.

सध्या 64 मीटर लॅडरद्वारे सुमारे 21 व्या मजल्यापर्यंत तर 68 मीटर उंचीच्या शिडीद्वारे 23 ते 25 व्या मजल्यापर्यंत पोहचता येते. नव्या 104 मीटर टर्न टेबल लॅडरमुळे 34 मजल्यांपर्यंत थेट पोहचून आग विझविणे, बचावकार्य करणे आणि नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे शक्य होणार असल्याचे अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

नव्या शिडीची निविदा प्रक्रिया सुरू असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहचली असून लवकरच अत्याधुनिक शिड्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai Fire Brigade
Dadar Traffic Update: भवानी शंकर रोड आता तीन महिने ‌‘वन वे‌’; दादर पश्चिमची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक बदल

नव्या शिडीची वैशिष्ट्ये

  • थेट 34 मजल्यापर्यंत जाता येणार

  • नागरिकांनाही सुरक्षित बाहेर काढता येणार

  • बचाव कार्याच्या वेळेत होणार बचत

  • शिडी हाताळण्यासाठी कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

वर्षभरात 325 पेक्षा जास्त आगी

वर्षभरात मुंबई शहर व उपनगरात लहान-मोठ्या 325 पेक्षा जास्त आगी लागल्या. या झोपडपट्टीसह इमारत व व्यावसायिक गळ्यांमधील आगींचा समावेश आहे. यात उपनगरात 200 तर शहरात 125 आगी लागल्या. यात एअरपोर्ट मेट्रो स्टेशन मे महिन्यात टी 2 एअरपोर्ट मेट्रो स्टेशनच्या तांत्रिक रुममध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. तर लिंकिंग रोड, वांद्रे येथील मॉलला लागलेल्या भीषण आगीत 100 हून अधिक दुकाने खाक झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news