Mumbai FDA action: किचनमध्ये झुरळे, सडलेले अन्न अन् अस्वच्छ चप्पल; मुंबईतील ७ फूड आऊटलेट्सचे परवाने निलंबित

अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या धडक कारवाईत 'मॅकडोनाल्ड्स'च्या एका केंद्रासह तब्बल सात खाद्यपेय केंद्रांचे (फूड आऊटलेट्स) परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
FDA India News
FDA India NewsPudhari
Published on
Updated on

Mumbai FDA action

मुंबई: खाद्यपदार्थांमधील सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आणि अस्वच्छतेचा फटका मुंबईतील नामांकित हॉटेल्सना बसला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या धडक कारवाईत 'मॅकडोनाल्ड्स'च्या एका केंद्रासह तब्बल सात खाद्यपेय केंद्रांचे (फूड आऊटलेट्स) परवाने निलंबित करण्यात आले आहेत. वारंवार सुधारणा नोटिसा देऊनही नियमांची पायमल्ली करणाऱ्या या उपाहारगृहांवर अखेर कठोर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.

तपासणीदरम्यान अनेक त्रुटी आढळून आल्या; यामध्ये कीटकांचा प्रादुर्भाव, तापमानाचे अयोग्य नियंत्रण, 'क्रॉस-कंटॅमिनेशन'चा (एका अन्नातील घटक दुसऱ्या अन्नात मिसळण्याचा) धोका आणि यापूर्वी निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटींची पूर्तता न करणे यांसारख्या बाबींचा समावेश होता.

FDA India News
Pune FDA Action: तीन हॉटेलां­वर एफडीएची कारवाई; अंगणवाड्यांना पुरवठा करणाऱ्या साठ्यामध्ये दोष

'मॅकडोनाल्ड्स'च्या किचनमध्ये जिवंत झुरळे

कुलाबा येथील मेट्रो हाऊसमध्ये 'हार्डकॅसल रेस्टॉरंट्स'द्वारे चालवल्या जाणाऱ्या मॅकडोनाल्ड्सच्या केंद्रावर १९ ऑगस्ट रोजी पुन्हा तपासणी करण्यात आली. यात असे आढळून आले की, यापूर्वी दिलेल्या सुधारणा नोटीसमध्ये नमूद केलेल्या २० पैकी १८ त्रुटींची पूर्तता अजूनही करण्यात आलेली नव्हती.

FDA ला तपासणीत अचूक तापमान न दर्शवणारी रेफ्रिजरेशन उपकरणे, जिवंत झुरळे, अन्न तयार करण्याच्या आणि वाढण्याच्या जागांजवळ अन्नाचा कचरा, उघडे दिवे आणि अस्वच्छ चप्पल व साफसफाईचे कपडे हाताळल्यानंतर लगेचच अन्नपदार्थांना स्पर्श करणारे कर्मचारी आढळले.

'इंजिनिअस किचन्स'वर कारवाई

FDA ने मालाड येथील 'इंजिनिअस किचन्स प्रायव्हेट लिमिटेड' (नोव्हारा) विरुद्धही कारवाई केली. पुनर्रतपासणीदरम्यान, पूर्वीच्या सुधारणा नोटीसमध्ये नमूद केलेल्या २५ गंभीर त्रुटींपैकी १४ त्रुटी अजूनही दूर न केल्याचे आढळले. अधिकाऱ्यांनी जुनी किंवा नियमांचे पालन न करणारी स्वयंपाकाची उपकरणे वापरणे, ग्रीस आणि झुरळे पकडणाऱ्या जाळ्यांचा अभाव, कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या अपूर्ण नोंदी, 'FoSTaC' कागदपत्रांची कमतरता आणि स्वयंपाकाचे तेल किंवा तूप यांबाबतची अनिवार्य माहिती प्रदर्शित न करणे यांसारख्या त्रुटींचा उल्लेख केला.

ग्राहकाच्या तक्रारीनंतर 'स्टेटस रेस्टोरेंट'वर कारवाई

नरिमन पॉईंट येथील प्रसिद्ध 'स्टेटस रेस्टॉरंट'मध्ये एका कर्मचाऱ्याने स्वच्छ धुऊन ठेवलेल्या भांड्यांवरच तोंड धुतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याशिवाय, अस्वच्छ चमचे, साचलेले घाण पाणी, शाकाहारी व मांसाहारी अन्न एकत्र ठेवणे अशा अनेक गंभीर त्रुटी एफडीएला आढळून आल्या.

इतर हॉटेल्सवरही एफडीएचा बडगा

इंजिनिअस किचन्स (मलाड): २५ पैकी १४ गंभीर नियमांचे उल्लंघन; निकृष्ट दर्जाची साधने आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीचा अभाव.

खार जिमखाना: फ्रोजन फूड अयोग्य पद्धतीने वितळवणे, गरम पाण्याची सोय नसणे आणि किचनमधील साचलेली ग्रीस.

बजरंग स्वीट मार्ट (सांताक्रूझ): अन्न सुरक्षेच्या तपासणीत अवघे ४७% गुण; उखडलेले प्लास्टर, गंजलेली साधने आणि अस्वच्छता.

एएसएम हॉटेल्स (अंधेरी वेस्ट): 'शेड्युल ४' च्या अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे परवाना निलंबित.

FDA India News
Mumbai FDA action : उंदीर-झुरळांमुळे दोन हॉटेलांचे परवाने निलंबित

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news