Mumbai FDA Action: मुंबईत ब्रिजवासी, झेप्टोचे परवाने निलंबित; एफडीएची कारवाई, स्वच्छता व आरोग्यविषयक नियमांचे गंभीर उल्लंघन

मालाड पश्चिम आणि भांडुप येथील आस्थापनांमध्ये तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळल्याने सणासुदीच्या काळात कारवाई
Mumbai FDA Action
Mumbai FDA Actionpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेसाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)मुंबईत तपासणी मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेंतर्गत मालाड पश्चिम येथील मे. क्रिष्णम रिटेल्स एलएलपी (ब्रिजवासी) आणि भांडुप येथील मे. झेप्टो लि.

या दोन आस्थापनांचे अन्नसुरक्षा परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. दोन्ही ठिकाणी तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळल्याने तात्काल प्रभावाने ही कारवाई करण्यात आली.

Mumbai FDA Action
Pankaja Munde: ‘मिठी’ पुनरुज्जीवन कामांचा पंकजा मुंडेंकडून आढावा

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सणासुदीच्या काळात राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. अन्नसुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदी आणि स्वच्छतेच्या निकषांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे.

मालाडमधील ब्रिजवासीचा परवाना निलंबित

मालाड पश्चिम येथील मे. क्रिष्णम रिटेल्स एलएलपी (ब्रिजवासी) या आस्थापनेची ९ ऑक्टोबर २०२६ रोजी तपासणी करण्यात आली.

या तपासणीत सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका निर्माण करू शकणाऱ्या गंभीर व मोठ्यात्रुटी आढळून आल्या. त्यामुळे अन्नसुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील कलम ३२ (१) आणि ३२ (३) अन्वये या आस्थापनेचा एफएसएसएआय परवाना १० ऑक्टोबरपासून तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mumbai FDA Action
Govandi Pollution Case: गोवंडीकरांच्या १७ वर्षांच्या न्यायालयीन लढाईला अखेर यश! एसएमएस कंपनीचा प्रकल्प स्थंलातरित

भांडुपमधील झेप्टोवरही कारवाई

भांडुप येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील गोपाल इस्टेटमधील मे. झेप्टो लिमिटेडच्या आस्थापनेची ७ ऑक्टोबर रोजी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यावेळी अन्न व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या स्वच्छता आणि आरोग्यविषयक निकषांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे तपासणीत आढळून आले.

अन्नसुरक्षा व मानके (अन्न व्यवसायाचे परवाना व नोंदणी) नियमन, २०११ मधील परिशिष्ट चारमधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याने संबंधित आस्थापनेचा अन्नसुरक्षा परवाना ९ ऑक्टोबर २०२६ पासून तात्काल प्रमावाने निलंबित करण्यात आला. यासाठी अन्नसुरक्षा व मानके कायद्यातील कलम ३२ (३) आणि संबंधित नियमनातील तरतुदींचा आधार घेण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) या धडक कारवाईमुळे अनेक व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांक

अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत, अस्वच्छता किंवा अन्य गैरप्रकारांबाबत नागरिकांनी तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केले आहे. यासाठी १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच https://complaints.mahafda.in या ऑनलाइन पोर्टलवरही तक्रार नोंदवता येणार आहे,असेही अन्न व औषध प्रशासनाने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news