Mumbai FDA action : मुंबईतील ११ खाद्य आस्थापनांवर एफडीएचा बडगा

अस्वच्छता, किडींचा प्रादुर्भाव; अन्न साठवणुकीतील त्रुटींमुळे ८ परवाने, ३ नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित
Mumbai FDA action
Mumbai FDA actionAI image
Published on: 
Updated on: 

मुंबई : मुंबई विभागातील खाद्य आस्थापनांत अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन व गंभीर अस्वच्छता आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ११ आस्थापनांवर कारवाई केली. यात आठ आस्थापनांचे परवाने, तर तीन आस्थापनांची नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित करण्यात आली आहेत. अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक, शीतकपाटातील चुकीचे तापमान, माशा-झुरळांचा प्रादुर्भाव, उघडा कचरा तसेच कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी व प्रशिक्षणाच्या नोंदींचा अभाव अशा त्रुटी तपासणीत आढळल्या.

बोरिवली पश्चिम येथील नॉम नॉम रेस्टॉरंट्स, मम्माज किचन आणि छोटूस किचन येथे अन्नपदार्थांची योग्य पद्धतीने साठवणूक व शीतकरण केले जात नसल्याचे आढळले. अन्नपदार्थांच्या खरेदीची बिले, प्रयोगशाळा तपासणी अहवाल, लेखापरीक्षणाच्या नोंदी आणि कीड नियंत्रणाच्या नोंदी उपलब्ध नव्हत्या. माशा व किडींचा प्रादुर्भाव, उघडी कचरापात्रे आणि स्वच्छतेचा अभावही आढळला. कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय तपासणी, आरोग्य व लसीकरणाच्या नोंदी तसेच आवश्यक प्रशिक्षणाची कागदपत्रे नव्हती.

Mumbai FDA action
Mumbai October heat: मुंबई लोकललाही ऑक्टोबर हिटचा तडाखा, रूळ प्रसरण पावल्याने आपत्कालीन ब्लॉक घेण्याची वेळ

अंधेरीतील मोमोज केंद्रातही नियमांचा भंग

अंधेरी पश्चिम येथील सुरज लामा मोमोज येथे अन्न परवान्यावरील पत्ता अद्ययावत नसल्याचे तसेच परवाना दर्शनी भागात न लावल्याचे आढळले. अन्नपदार्थ, इतर वस्तू व स्वच्छतेसाठी वापरली जाणारी रसायने एकत्र ठेवण्यात आली होती. पाणी व प्रयोगशाळा तपासणी अहवाल, स्वच्छतेचे वेळापत्रक व गरम पाण्याची सुविधा याबाबत त्रुटी आढळल्या. कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी, प्रशिक्षण व लेखापरीक्षणाच्या नोंदी नव्हत्या. उघडा कचराही आढळला.

ताडदेव, मुंबई सेंट्रलमधील उपाहारगृहांवर कारवाई

ताडदेव येथील ताडदेव लंच होम विरोधात चिकन शेजवान राईसमध्ये कीटक आढळल्याची तक्रार होती. तपासणीत शीतकपाटाचे अयोग्य तापमान, अन्न उघडे ठेवणे, माशांचा प्रादुर्भाव, अस्वच्छता, निसरडा मजला, खराब प्लास्टर आणि उघडा कचरा आढळला. कर्मचाऱ्यांकडे हातमोजे व एप्रन नव्हते. अन्नसुरक्षेशी संबंधित आवश्यक नोंदीही उपलब्ध नव्हत्या.

मुंबई सेंट्रल येथील शगुन व्हेज रेस्टॉरंट येथे शेजवान राईस व स्वयंपाकघर स्वच्छतेबाबत तक्रारीनंतर तपासणी केली. शीतकपाटातील तापमानातील त्रुटी, बर्फ व अन्नपदार्थ उघडे ठेवणे, माशांचा प्रादुर्भाव, अपुरा प्रकाश व निसरडा मजला आढळला. वापरलेल्या तेलाच्या गुणवत्तेची नोंद ठेवली जात नव्हती.

Mumbai FDA action
Raigad Water Crisis : नोव्हेंबरपासून उरणमध्ये पाणीकपातीचे संकेत

कूपर रुग्णालयातील उपाहारगृहातही अस्वच्छता

विलेपार्ले पश्चिम येथील कूपर रुग्णालय व एचबीटी वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी उपाहारगृह चालवणाऱ्या सत्कार केटरर्स येथे माशा व झुरळांचा प्रादुर्भाव आढळला. कीड नियंत्रणाची व्यवस्था प्रभावी नसल्याचे दिसून आले. कच्चे व शिजवलेले तसेच शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची योग्य विभागणी केली जात नव्हती. स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता यातही त्रुटी आढळल्या. कर्मचाऱ्यांकडे संरक्षक साधने, वैद्यकीय तपासणी आणि प्रशिक्षणाच्या नोंदींचा अभाव होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news