Mumbai FDA Action: झेप्टो केंद्रासह, ब्लिंक कॉमर्स, आझाद आईस्क्रीम हाऊसवर एफडीएची कारवाई

मालाडमध्ये धान्याच्या पाकिटांत आढळली १५ जिवंत झुरळे
FDA Food Safety Action
FDA Food Safety ActionPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) माझगावमधील श्री प्रसाद बेकरी, वडाळ्यातील ब्लिंक कॉमर्स, दादरमधील आझाद आईस्क्रीम हाऊस आणि हॉटेल नंदा, अंधेरीतील फोक्लो टेक्नॉलॉजीज आणि ईट निनो, माटुंग्यातील जय काली फरसाण मार्ट, गोरेगावमधील मनोज समोसावालावर कारवाई केली.

एफडीएने केलेल्या तपासणीत भांडुप येथील झेप्टोच्या साठवणूक केंद्रासह मालाड, सांताक्रूझ, वांद्रे, कालबादेवीतील आस्थापनांमध्ये त्रुटी आढळल्या. या कारवाईत आस्थापनांचे परवाने व नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित करण्यात आली आहेत.

FDA Food Safety Action
Government Health Labs: साडेतीनशे तालुक्यांत सरकारी आरोग्य प्रयोगशाळा उभारणार!

मालाड येथील माईझ मेक्सिकन किचन आणि हार्वेस्ट सॅलड या आस्थापनांच्या तपासणीत धक्कादायक प्रकार समोर आला. अन्न साठवणुकीच्या कपाटांवर, कंपनीकडून बंद पाकिटांत विक्रीसाठी ठेवलेल्या क्विनोआमध्ये १५ जिवंत झुरळे आढळली.

त्याचबरोबर नवी मुंबईतील मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून येणारे सॉस, चिकन आणि मसाल्यांच्या पाकिटांवर आवश्यक माहितीचे लेबल नव्हते. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी, लसीकरण आणि अन्न सुरक्षा प्रशिक्षणाबाबतही त्रुटी आढळल्या. त्यामुळे या आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला.

FDA Food Safety Action
Deonar Dumping Ground Lighting: देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या दिव्यांवर तब्बल १२ कोटी रुपयांची उधळपट्टी

भांडुप येथील झेप्टोच्या साठवणूक केंद्रात शीतकक्षाचे तापमान ८.५ अंश सेल्सिअस, तर त्यालगतच्या कक्षाचे तापमान २२.२ अंश सेल्सिअस आढळले. खराब आणि परत आलेली उत्पादने विक्रीयोग्य मालासोबत ठेवण्यात आली होती. साठवणूक कपाटांवर धूळ, गंज आणि अन्नपदार्थांचे अवशेष आढळले.

चर्चगेट येथील जनता फास्ट फूड सेंटर आणि वांद्रे पश्चिम येथील ए१ झमझम ज्यूस सेंटरमध्ये स्वच्छता व आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन आढळले. या दोन्ही आस्थापनांकडून अनुक्रमे ६० हजार आणि एक लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

एअर इंडिया इमारतीतील १५ आणि विधान भवन परिसरातील १३ अशा एकूण २८ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत १ लाख ५७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून, दोन सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

राज्यात २५ आस्थापनांचे परवाने निलंबित

अन्नपदार्थांच्या साठवणुकीत आणि विक्रीत स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर धडक मोहीम राबवली. २० आणि २१ नोव्हेंबर रोजी केलेल्या तपासणीत मुंबई वगळता राज्यातील २५ आस्थापनांचे परवाने आणि नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित करण्यात आली.

पुणे विभागातील १७, नाशिक विभागातील सहा आणि कोकण विभागातील दोन आस्थापनांवर ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत तसेच दोन गुन्हे दाखल करून एका व्यक्तीला अटक करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.