Mumbai FDA Action: कांजूरमार्गमधील गजानन वडापाव सेंटरवर एफडीएची कारवाई; कुर्ल्यातील हॉटेल-स्वीट्सलाही दणका, परवाने निलंबित

मुंबईतील कांजूरमार्ग, मुलुंड, कुर्ला आणि जोगेश्वरी परिसरातील ७ आस्थापनांवर FDA ने कारवाई केली. अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, अयोग्य अन्न साठवणूक आणि वायुवीजनाच्या त्रुटींमुळे परवाने किंवा नोंदणी निलंबित करण्यात आली.
FDA food safety inspection
FDA food safety inspectionpudhari photo
Published on
Updated on

मुलुंड: अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यानंतर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कांजूरमार्गातील गजानन वडापाव सेंटरसह मुलुंड, कुर्ल्यातील हॉटेल-स्वीट्सचे परवाने/नोंदणी निलंबित केली आहे.

८ आणि ९ सप्टेंबर रोजी एफडीएने केलेल्या तपासणीत या आस्थापनांमध्ये एफडीएच्या अनेक नियमांचा उल्लंघन झाल्याचे आढळून आले. या उल्लंघनांमध्ये कीटकांचा प्रादुर्भाव, अस्वच्छता, अन्नाची अयोग्य साठवणूक आणि अपुरी हवा खेळती राहणे यांचा समावेश होता.

FDA food safety inspection
Maharashtra Government Hospital: सरकारी रुग्णालयांत संगणकीकरणाचा फज्जा? डॉक्टरांकडून अजूनही कागदी चिठ्ठीचा वापर

सदर आस्थापनांमध्ये श्री गजानन वडापाव आणि स्नॅक्स सेंटर, कांजूरमार्ग; समर्थ स्वीट्स, जोगेश्वरी; एकवीरा झुणका भाकर केंद्र आणि मनीषा स्वीट्स, मुलुंड; नवाब शोध कॉर्नर; हॉटेल अश्विन; आणि जय महाराष्ट्र मसाला डोसा कॉर्नर यांचा समावेश आहे.

कांजूरमार्ग येथील श्री गजानन वडापाव येथे अन्न गरम करणे, थंड करणे आणि रेफ्रिजरेशनच्या तापमानावर नियमितपणे लक्ष ठेवले जात नव्हते.

स्वयंपाकघराला दरवाजा नसल्यामुळे कीटकांच्या प्रवेशाचा धोका वाढला होता, तसेच अन्नाच्या संपर्कात येणारी काही उपकरणे अयोग्य सामग्रीपासून बनवलेली असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी संबंधित आस्थापनांच्या विरोधात कारवाई केली.

समर्थ स्वीटच्या प्रवेशद्वारावरच गटर व कचरा

एका तक्रारीनंतर तपासणी केली असता, समर्थ स्वीट्सच्या प्रवेशद्वाराजवळ उघडे गटार आणि कचरा आढळून आला. त्यांच्या उत्पादन विभागात योग्य कार्यप्रवाहाचा अभाव होता, ज्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका वाढला होता. उत्पादन विभागात वैयक्तिक वस्तू, कपडे आणि अंथरूण-पांघरूण आढळून आले.

FDA food safety inspection
Mumbai Ganeshotsav Police Security: गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; १६ हजार ८०० अधिकारी-कर्मचारी तैनात

अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन

एकवीरा झुणका भाकर केंद्र आणि मनीषा स्वीट्स येथे निरीक्षकांना गर्दीचे आणि अपुऱ्या वायुवीजनाचे उत्पादन क्षेत्र, कीटक प्रतिबंधाची अपुरी व्यवस्था आणि धूळ व कीटकांच्या संपर्कात येणारी अन्न तयार करण्याची जागा आढळून आली.

नवाब सीख कॉर्नरमध्ये मुंग्या असलेला रवा साठवलेला आणि कच्चे मांस उघडे ठेवलेले आढळले. कच्चे, शिजवलेले आणि खाण्यासाठी तयार अन्नपदार्थ योग्यरित्या वेगळे ठेवलेले नव्हते, तसेच शीतकरण आणि साठवणुकीची जागा अस्वच्छ होती.

हॉटेल अश्विन आणि जय महाराष्ट्र मसाला डोसा कॉर्नर हे देखील साठवणूक, तापमान नियंत्रण, स्वच्छता आणि कीटक नियंत्रणातील त्रुटींसह अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news