Mumbai FDA Action: किचनमध्ये झुरळे; ढाब्यांत अस्वच्छता; डॉमिनोजसह मुंबईतील तीन आस्थापनांचे परवाने निलंबित

परळ, भांडुप आणि कुर्ल्यात तपासणीदरम्यान अस्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने परवाने आणि नोंदणी निलंबित
FDA Action on Restaurants
FDA Action on RestaurantsPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर कारवाईचा धडाका लावला आहे. सोमवार, मंगळवार या दोन दिवसांमध्ये मुंबईतील डॉमिनोज पिझ्झासह तीन अन्न आस्थापनांचे परवाने आणि नोंदणी निलंबित करण्यात आली आहे.

भांडुपमधील माझ फूड पार्सल अँड केटरिंगच्या स्वयंपाकघरात झुरळांचा प्रादुर्भाव, तर कुर्ल्यातील मुघल ढाब्यात अस्वच्छता आढळली. परळ येथील डॉमिनोजमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची साठवण व तयारी करताना नियमांचे उल्लंघन झाल्याचे तपासणीत समोर आले.

FDA Action on Restaurants
Station Master Attack: लोकल उशिराने धावण्‍याचा राग स्टेशन मास्तरांवर! रेल्वे कर्मचाऱ्यांचा कल्याणमध्ये एल्गार, काम बंद आंदोलनाचा इशारा

एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, परळ येथील डॉमिनोजच्या फेरतपासणीत शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकाच डीप फ्रीजमध्ये ठेवले जात असल्याचे आढळले. चिकन आणि पनीर एकाच ओव्हन किंवा ग्रिलवर तयार केले जात होते. याशिवाय पॅकेजिंग साहित्याचा अनुरूपता अहवाल, अन्न वितरण वाहनांच्या नोंदी आणि उपकरणांच्या देखभालीचे अभिलेख उपलब्ध नव्हते.

याप्रकरणी १२ ऑक्टोबरला परवाना निलंबित करण्यात आला. भांडुप पश्चिम येथील माझे फूड पार्सल अँड केटरिंगच्या स्वयंपाकघरात झुरळे, तुंबलेली गटारे आणि अस्वच्छता आढळली. तयार अन्नपदार्थांवर लेबल नव्हते.

कृत्रिम खाद्यरंग आढळण्याबरोबरच मेनूमध्ये बटर नमूद असताना फॅट स्प्रेडचा वापर केला जात असल्याचेही तपासणीत दिसून आले. कामगारांकडे ॲप्रन आणि हातमोजे नव्हते. त्यामुळे १३ ऑक्टोबरला परवाना निलंबित करण्यात आला.

FDA Action on Restaurants
Navi Mumbai Crime News: अल्पवयीन मुलीची अत्याचार करून हत्या; नराधम २४ तासांत जेरबंद

गंजलेले रेफ्रिजरेटर

कुर्ल्यातील मुघल ढाब्याबाबत ऑनलाइन मागविलेल्या शिळ्या अन्नाची तक्रार आल्यानंतर तपासणी करण्यात आली. तेथे अन्नकचऱ्याने तुंबलेली गटारे, साचलेले घाण पाणी, गंजलेले रेफ्रिजरेटर आणि शाकाहारी-मांसाहारी पदार्थांची स्वतंत्र व्यवस्था नसल्याचे आढळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news