Mumbai FDA Action: मुंबई विभागात ८५९ किलो अन्नसाठा जप्त; मिठाईत अतिरिक्त रंगाचा संशय आल्याने एफडीएची कारवाई

जप्त अन्नसाठ्याची किंमत २.७० लाख रुपये; मिठाईत अतिरिक्त रंग वापरल्याचा संशय
FDA Food Safety Action
FDA Food Safety ActionPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबई विभागात केलेल्या तपासणीत दूध, पनीर, तांदूळ आणि मिठाईसह एकूण ८५९ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत २ लाख ७० हजार २९० रुपये आहे. मिठाईमध्ये अतिरिक्त रंग वापरल्याचा संशय असल्याने संबंधित आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

यशोदा डेअरी येथून ७६ हजार ५१० रुपये किमतीचे २५०.५० किलो दूध पावडर, म्हशीचे दूध आणि पनीर जप्त करण्यात आले. क्लासिक एंटरप्रायझेस येथून ३५ हजार ५२० रुपये किमतीचा २९६ किलो तुटलेला तांदूळ जप्त केला.

गीतांजली केटरिंग सर्व्हिसेस येथून ३६ हजार रुपये किमतीचा ७२ किलो मोहनथाळ, तर अरिहंत स्वीट्स येथून १ लाख २२ हजार २६० रुपये किमतीची २४०.५० किलो विविध मिठाई जप्त करण्यात आली.

FDA Food Safety Action
Mumbai Air Pollution: मुंबईत प्रदूषण करणाऱ्या आरएमसी कारखान्यांना नोटीस; सात दिवसांत त्रुटी दूर न केल्यास कारवाईचा इशारा

नागपूर, पुणे, कोकण, छ. संभाजी नगरातही दणका

अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील विभागांत केलेल्या विशेष तपासणी मोहिमेत ६ हजार २२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत २२ लाख २२ हजार १६५ रुपये आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्ता, सुरक्षितता आणि लेबलिंगबाबत संशय निर्माण झाल्याने नागपूर, पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगरात ही कारवाई करण्यात आली.

FDA Food Safety Action
Mumbai Bribery Case: पंधरा लाखांची लाच घेताना आयकर निरीक्षक सीबीआयच्या जाळ्यात

नागपूर विभागातील कामठी येथील राधेकृष्ण फूड प्रॉडक्ट्स या आस्थापनेत आवश्यक परवाना नसल्याचे आढळले. येथून १० लाख ६० हजार ९७० रुपये किमतीची १ हजार ७९५ किलो ममता सोनपापडी जप्त करण्यात आली.

पुणे विभागात ३५८ किलो बदाम, ४९३ किलो काळे बेदाणे आणि ४७८ किलो फुटाणे डाळ जप्त करण्यात आली. कोकण विभागात १ हजार २९८ किलो खाद्य गोंद, तसेच ६३१ किलो गूळ, गूळ पावडर आणि मधाचा साठा जप्त केला. छत्रपती संभाजीनगर विभागात ३८८ किलो मिलेट उत्पादने आणि १९५ किलो दूध बिस्किटे जप्त करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news