मुंबई : शमीलच्या पडघ्यातील घरात सापडले बाॅम्बस्फोट घडविण्याच्या कटाचे पुरावे

file photo
file photo
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : 'ईस्लामिक स्टेट ऑफ ईराक अँड सीरिया' (ईसीस) या दहशतवादी संघटनेशी संबंधीत महाराष्ट्र मॉड्युलप्रकरणात ठाण्यातील पडघा येथील रहिवासी शमील साकिब नाचन याला बेड्या ठोकल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी त्याच्या घरावर छापेमारी केली. या कारवाईत शमील आणि ईसीस स्लीपर मॉड्युलच्या अन्य सदस्यांनी देशातील शांतता आणि सांप्रदायिक सलोखा बिघडवण्यासाठी रचलेला कट उघडकीस आणणारी अनेक प्रकारची अपराधी सामग्री एनआयएने जप्त केली आहे. यात अनेक मोबाईल फोन, हार्ड डिस्क आणि काही हस्तलिखित कागदपत्रांचा समावेश असून एनआयएकडून याची तपासणी आणि विश्लेषण करण्यात येत आहे.

एनआयएने ईसीसच्या महाराष्ट्र माॅड्युलचा पर्दाफाश करत २८ जून रोजी गुन्हा दाखल करुन कारवाई सुरु केली. एनआयएच्या पथकांनी मुंबई, ठाणे आणि पुणे येथील पाच ठिकाणी छापेमारी करत मुंबईतील तबिश सिद्दीकी, पुण्यातील झुबेर शेख उर्फ अबु नुसैबा, ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला अशा चाैघांना अटक केली होती. त्यानंतर एनआयएने डाॅ. अदनान अली सरकार याला पुण्यातून तर, पडघा येथून आकिफ नाचन याला बेड्या ठोकल्या. गेल्या आठवड्यात एनआयएने शमील नाचनला अटक केली.

शमील हा झुल्फिकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, सिमाब नसिरुद्दीन काझी आणि अब्दुल कादिर पठाण या इतर पाच आरोपींसह अन्य काही संशयितांसोबत काम करत होता. इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) बनवून देशात मोठा स्फोट घडवून आणण्याचा कट होता. शमिलसह ईसीस स्लीपर मॉड्यूलच्या अन्य सदस्यांनी पुण्यातील कोंढवा येथील एका घराला आपला बेस कॅम्प बनवला होता. येथे त्यांनी आयईडी एकत्र केले होते. गेल्या वर्षी बॉम्ब प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करुन त्यात भाग घेतला होता. त्यांनी बनवलेल्या आयईडीची चाचणी घेण्यासाठी त्यांनी या ठिकाणी नियंत्रित स्फोटही घडवून आणला होता. देशातील शांतता आणि जातीय सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने दहशतवादी कृत्ये करण्याचा कट या आरोपींकडून रचण्यात आल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news