मुंबई : पुढारी वृत्तसेवा मालाड रेल्वे स्थानक लगतच्या आनंद रोड रुंदीकरणासाठी आज (शनिवार) सकाळी पुन्हा मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तोडक कारवाई करण्यात आली. त्यामुळे या रस्त्या शेजारी असलेल्या दुकानांच्या मालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
काही दिवसांपूर्वी पालिकेने अशीच कारवाई केली होती. मात्र जलपान आणि दिल्ली स्वीट्स या दुकानांवरील कारवाई थांबवली होती. पण आज पुन्हा तोडक कारवाईमुळे रस्ता रुंदीकरणाची वाट मोकळी झाली आहे.
तोडक कारवाई करताना मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जास्त लोक जमणार नाहीत याचीही काळजी घेण्यात आली. तोडक कारवाई लवकरात लवकर आटोपण्यात आली आहे.
हेही वाचा :