

मुंबई : महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून मराठी अभिनेत्रीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. कांदिवली पूर्व येथील प्रभाग क्रमांक २५ साठी भाजपने प्रसिद्ध मराठी अभिनेत्री निशा परुळेकरला एबी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्यान एकेकाळी मोठा पडदा गाजवणाऱ्या निशा आता जनसेवेच्या वसा घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. निशा परुळेकर यांच्या उमेदवारीमुळे कांदिवली पूर्व भागातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे योगेश भोईर किंवा माधुरी भोईर यांचे तगडे आव्हान असणार आहे. एका बाजूला शिवसेनेचा स्थानिक जनसंपर्क आणि दुसऱ्या बाजूला निशा परुळेकर यांचा चाहता वर्ग, असा हा चुरशीचा सामना पाहण्यासारखा ठरेल.