Mumbai Concert Tragedy: मुंबईतल्या दोन विद्यार्थ्यांचा जीव घेणारी Ecstasy टॅबलेट काय आहे? शरीरावर होणारे दुष्परिणाम वाचा

Mumbai Rave Drug Overdose Case: गोरेगावमधील कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसने दोन MBA विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात MDMA (Ecstasy) घेतल्याचा संशय आहे.
Mumbai Rave Drug Overdose Case
Mumbai Rave Drug Overdose CasePudhari
Published on
Updated on

what is ecstasy pill explained in marathi

मुंबईतील गोरेगाव (पूर्व) परिसरात झालेल्या एका रेव-पार्टीसारख्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसने दोन MBA विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून सध्या तपास सुरू आहे.

घटना नेमकी काय घडली?

11 एप्रिल रोजी गोरेगावमधील एका एक्झिबिशन ग्राउंडवर मोठा म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सुमारे 3 ते 4 हजार लोक उपस्थित होते, ज्यामध्ये कॉलेज विद्यार्थीही होते.

मृत झालेले दोघेही दक्षिण मुंबईतील एका नामांकित MBA कॉलेजचे विद्यार्थी होते. ते त्यांच्या 15 जणांच्या ग्रुपसोबत या कार्यक्रमाला गेले होते. कॉन्सर्टदरम्यान काही विद्यार्थ्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं, श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना तातडीने जोगेश्वरी आणि इतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मृत्यू कसा झाला?

पोलिसांच्या माहितीनुसार:

  • एका विद्यार्थ्याचा रविवारी सकाळी मृत्यू झाला

  • त्यानंतर दुपारी त्याच ग्रुपमधील एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला

  • तिसरी विद्यार्थिनी गंभीर अवस्थेत होती, तिला नंतर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.

कोणते ड्रग्ज घेतल्याचा संशय?

प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की काही विद्यार्थ्यांनी कॉन्सर्टमध्ये जाण्यापूर्वी MDMA (Ecstasy) या ड्रगचं सेवन केलं होतं. तसेच कार्यक्रमादरम्यान मद्यपानही करण्यात आलं होतं. अंतिम निष्कर्ष फॉरेन्सिक अहवालानंतरच स्पष्ट होणार असला, तरी MDMA ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्याचं मानलं जात आहे.

MDMA म्हणजे काय?

MDMA (Ecstasy) हे एक सिंथेटिक पार्टी ड्रग आहे. याचं पूर्ण नाव आहे मिथिलिनडायऑक्सी मेथॲम्फेटा माइन (Methylenedioxymethamphetamine). हे सर्वप्रथम 1912 मध्ये जर्मनीतील एका कंपनीने तयार केलं होतं.

आजच्या काळात हे ड्रग टॅब्लेट, कॅप्सूल आणि पावडर या स्वरूपात आढळतं आणि मुख्यतः पार्टी, कॉन्सर्ट किंवा क्लबमध्ये वापरलं जातं.

  • हे मेंदूवर थेट परिणाम करतं

  • उत्साह, ऊर्जा आणि ‘हाय’ फीलिंग देतं

  • पण जास्त प्रमाणात घेतल्यास हृदयाची वाढ, श्वासोच्छवासाचा त्रास, शरीराचं तापमान वाढणं अशा गंभीर समस्या निर्माण होतात

या ड्रगमध्ये छोटासा केमिकल बदल करून मिथिलोन (methylone) सारखी नवीन ड्रग्सही तयार केली जातात, जी अधिक धोकादायक असू शकतात.

हे ड्रग दारु सोबत घेतल्यावर काय परिणाम होतो?

MDMA (Ecstasy) आणि दारू एकत्र घेतली की शरीरावर होणारा परिणाम हा खूप गुंतागुंतीचा आणि धोकादायक असतो. कारण हे दोन्ही पदार्थ शरीरावर अगदी उलट प्रकारे काम करतात. MDMA हे मेंदूला उत्तेजित करणारे औषध आहे, त्यामुळे ऊर्जा वाढते, मूड “हाय” होतो, थकवा जाणवत नाही. तर दारू मेंदूला थकवणारी असते, त्यामुळे शरीर सैल होतं, निर्णयक्षमता कमी होते.

MDMA घेतल्यावर शरीराचं तापमान नैसर्गिकपणे वाढतं. त्यात दारू घेतल्यावर शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) अधिक वाढते. या दोन्ही गोष्टी एकत्र घेतल्या तर शरीर खूप गरम होऊ शकतं, ज्याला ओव्हरहिटिंग म्हणतात. अशा परिस्थितीत शरीराला थंड ठेवणं कठीण होतं आणि ते जीवावर बेतू शकतं.

सर्वात मोठा धोका म्हणजे ओव्हरडोस. दारू घेतल्यावर MDMA चा परिणाम कमी जाणवतो, त्यामुळे व्यक्ती पुन्हा पुन्हा MDMA घेते. पण शरीरात त्याचं प्रमाण वाढत जातं आणि अचानक ओव्हरडोस होऊन मृत्यू होऊ शकतो.

Mumbai Rave Drug Overdose Case
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजमेंटवर नाराज? कोचने केला मोठा खुलासा

पोलिसांनी काय कारवाई केली?

या प्रकरणात वनराई पोलीसांनी तत्काळ गुन्हा नोंदवला आहे.

खालील कलमांखाली केस दाखल करण्यात आली आहे:

  • भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 105 (मनुष्यवधासमान गुन्हा)

  • इतर संबंधित कलमे: 125, 125(b), 223(b), 3(5)

किती जण अटकेत?

या प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे:

  • दोन कॉलेज विद्यार्थी

  • एक संशयित ड्रग्स पुरवठादार

  • तीन इव्हेंटशी संबंधित व्यक्ती

यामध्ये इव्हेंट ऑर्गनायझर आणि सिक्युरिटीशी संबंधित लोकांचाही समावेश आहे. सर्व आरोपींना 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

विहान उर्फ आकाश सामल, इव्हेंट ऑर्गनायझर सनी विनोद जैन (NESCO इव्हेंट ऑर्गनायझर अँड मॅनेजमेंट) आणि इंटरनल सिक्युरिटी बालाकृष्णन बलराम यांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

अटक केलेल्या आरोपींची नावं

1) सनी जैन 2) बालकृष्ण कुरूप 3) रौनक खंडेवाल 4) आनंद पटेल 5) प्रतीक पांडे 6) आकाश समल

Mumbai Rave Drug Overdose Case
Shane Warne Death: शेन वॉर्नचा मृत्यू कोरोना लसीमुळेच झाला; मुलाच्या दाव्याने मोठी खळबळ, नेमकं काय म्हणाला?

कशाचा तपास सुरू आहे?

पोलिस सध्या या महत्त्वाच्या मुद्द्यांवर तपास करत आहेत:

  • ड्रग्स कार्यक्रमात कसे आणले गेले?

  • अजून कोण या नेटवर्कमध्ये सहभागी आहे?

  • इव्हेंट मॅनेजमेंटची सुरक्षा व्यवस्था अपुरी होती का?

तपासादरम्यान आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news