Mumbai Crime: मुंबईत 10.14 कोटींचे ड्रग्ज जप्त; 29.292 किलो अंमली पदार्थांसह 10 आरोपी जेरबंद

या कारवाईत एकूण 29.292 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत 10 कोटी 14 लाख 46 हजार 100 रुपये इतकी आहे.
Mumbai Crime
Mumbai CrimePudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई: अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा मुंबई यांनी विशेष मोहिम राबवत शहरातील विविध ठिकाणी धडक कारवाई करून तब्बल 10 आरोपींना अटक केली. या कारवाईत एकूण 29.292 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत 10 कोटी 14 लाख 46 हजार 100 रुपये इतकी आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईदरम्यान 902 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन), 20.700 किलो गांजा आणि 7.690 किलो हायड्रोपोनिक गांजा असा मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे. 1 एप्रिल 2026 ते 7 एप्रिल 2026 या कालावधीत वडाळा, अंधेरी, बांद्रा, मालाड, नागपाडा, घाटकोपर, धारावी, माहिम, गोरेगाव आदी ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

Mumbai Crime
Leopard Poaching: नॅशनल पार्कमध्ये तीन बिबट्यांची शिकार! सहा शिकारी अटकेत

वडाळा बीपीटी रोड परिसरात एमडी विक्री करणाऱ्या आरोपीकडून 218 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. तसेच विलेपार्ले परिसरातून 7.690 किलो हायड्रोपोनिक गांजा हस्तगत करण्यात आला. वडाळा टीटी परिसरात 20.700 किलो गांजा जप्त करण्यात आला, तर नागपाडा भागातून 117 ग्रॅम एमडी जप्त केले. याशिवाय गोरेगाव, धारावी, अंधेरी व माहिम परिसरातील विविध कारवाईंंमध्ये 281 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. बांद्रा परिसरातून 163 ग्रॅम एमडी तर मालाड येथून 123 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे.

Mumbai Crime
Maharashtra Sports Grace Marks SSC HSC: क्रीडा सवलतीचे गुण अंतिम टप्प्यात; खेळाडू विद्यार्थ्यांना दिलासा

ड्रग्ज जगताला हादरा

या सर्व प्रकरणांमध्ये एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास संबंधित युनिटकडून सुरू आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्षाने राबवलेल्या या विशेष मोहिमेमुळे मुंबईत ड्रग्जविरोधात मोठा आघात बसला असून शहर अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news