Mumbai crime : नायजेरियाला जाणारा २ लाख गोळ्यांचा साठा जप्त

डीआरआयच्या कारवाईत अंबरनाथमधील गुप्त कारखाना उजेडात
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

मुंबई : नायजेरियाला बेकायदेशीररीत्या पाठविण्यात येणाऱ्या २ लाख ट्रामाडॉल आणि टॅपेंटाडॉलच्या गोळ्या महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) जप्त केल्या. मुंबई एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास करताना अंबरनाथमध्ये गोळ्या तयार करणारा गुप्त कारखाना असल्याचे उघड झाले. डीआरआयने निर्यातदारासह तीन प्रमुख आरोपींना अटक केली आहे. या नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे आणि यापूर्वी अशा प्रकारे किती माल परदेशात पाठविण्यात आला, याचा तपास सुरू आहे.

Crime News
Mumbai spa raid : दादरच्या स्टार मॉलमधील स्पावर पोलिसांचा छापा

डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी २ ऑगस्टला गुप्त माहितीच्या आधारे नायजेरियाला पाठवला जाणारा माल अडवला. कागदपत्रांमध्ये या मालात प्रेगाबालिन कॅप्सूल असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, तपासणी केली असता मालामध्ये लपवून ठेवलेल्या १ लाख ट्रामाडॉलच्या आणि १ लाख टॅपेंटाडॉलच्या गोळ्या आढळल्या. ट्रामाडॉलचे वजन सुमारे २५ किलो, तर टॅपेंटाडॉलचे वजन सुमारे २० किलो होते.

पुढील तपासात या गोळ्या अंबरनाथमधील एका गुप्त कारखान्यात तयार केल्या जात असल्याचे समोर आले. तयार झालेल्या गोळ्या साध्या पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये भरून त्यांची ओळख लपवली जात होती. यानंतर हा माल मुंबई विमानतळाजवळील एका गोदामात नेला जात होता. तेथे गोळ्या पुन्हा पॅक करून नायजेरियाला पाठविण्याची तयारी केली जात होती.

यंत्रसामग्री आणि कच्चा माल जप्त

अंबरनाथमधील कारखान्यावर छापा टाकून डीआरआयने गोळ्या तयार करण्याची यंत्रसामग्री आणि मोठ्या प्रमाणात कच्चा माल जप्त केला. याशिवाय निर्यातदार, पुरवठादार, वाहतूकदार आणि गोदामाशी संबंधित ठिकाणीही झडती घेतली.या प्रकरणात निर्यातदार, मालाचा पुरवठा व समन्वय करणारा व्यक्ती आणि गोळ्या तयार करणारा कारखानदार अशा तीन जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

Crime News
11th admission : अकरावीसाठी महाविद्यालय बदलाची मागणी

ट्रामाडॉलवर कडक नियंत्रण

ट्रामाडॉल आणि टॅपेंटाडॉल ही वेदना कमी करण्यासाठी वापरली जाणारी औषधे आहेत. मात्र त्यांचा गैरवापर होण्याचा धोका असल्याने त्यांच्यावर नियंत्रण आहे. ट्रामाडॉलचा एनडीपीएस कायद्यानुसार सायकोट्रॉपिक पदार्थ म्हणून समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news