Mumbai spa raid : दादरच्या स्टार मॉलमधील स्पावर पोलिसांचा छापा

देहविक्रीचा संशय; सहा महिलांची सुटका, चौघांना अटक
Mumbai spa raid
Dadar Star Mall spa raidpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : दादर येथील स्टार मॉलमध्ये स्पाच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे ‘रेबल थाय स्पा’वर छापा टाकून सहा महिलांची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली.

शिवाजी पार्क पोलिसांना स्टार मॉलमधील संबंधित स्पामध्ये संशयास्पद प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने स्पावर छापा टाकला. या कारवाईत सहा महिला आढळून आल्या. त्यांचे वय २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mumbai spa raid
MHADA house fraud Mumbai : म्हाडाच्या घरासह गाळ्याच्या आमिषाने तिघांची ६४ लाखांची फसवणूक

पोलिसांकडून या महिलांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी करून त्यांना या व्यवसायात कोणी आणले, त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची माहिती घेतली जात आहे.

चौघांना कोठडीची हवा

या प्रकरणात पोलिसांनी आशा परमार, स्पाचा व्यवस्थापक साहिल पिल्लई, कैलाश यादव आणि करण वर्धन यांना अटक केली आहे. यातील एका महिलेवर दलाली केल्याचा आरोप असून, स्पाच्या व्यवस्थापकाचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

Mumbai spa raid
MBA MMS admission 2026 : एमबीए/एमएमएस प्रवेशाची दुसरी यादी जाहीर

स्पाच्या नावाखाली हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता, ग्राहक कसे आणले जात होते आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, शिवाजी पार्क पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. चौकशीत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news